सांगोला – कराड – दापोली बस सेवेला मंजुरी:
शहीद अशोक कामटे संघटनेच्या अथक प्रयत्नांचा यशस्वी निकाल!
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला येथून थेट कराड आणि दापोली (कोकण) जोडणारी बस सेवा सुरू करण्याची मागणी
शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने केली होती.
या मागणीला अखेर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मंजुरी दिली असून, सांगोला-कराड-दापोली बस सेवा मंगळवार, 14 एप्रिलपासून नियमित सुरू होणार आहे.
सदर बस सेवा सांगोला, नाझरे, आटपाडी, करगणी, भिवघाट, खानापूर, विटा,
कडेगाव, कराड, पाटण, कोयनानगर, चिपळूण, खेड आणि दापोली या ठिकाणांवर थांबेल. प्रवाशांसाठी ऑनलाईन आगाऊ आरक्षणही महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी अतिशय महत्त्वाची बस सेवा म्हणून हे प्रक्षिप्त ठरणार आहे.
सांगोला- दापोली बस सेवा सकाळी 8.00 वाजता सांगोला येथून निघेल, तर दापोलीतून सकाळी 6 वाजता प्रस्थान होईल.
शहीद अशोक कामटे संघटनेच्या अथक प्रयत्नांनी ही सेवा यशस्वी होण्यास मदत केली असून, या निर्णयाने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
संघटनेने या कार्यासाठी सर्व संबंधित परिवहन विभागाचे आणि आगार प्रमुख विकास पोफळे यांचे आभार व्यक्त केले.
सांगोला- दापोली मार्गावर प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना या बस सेवेतून सुविधा घेण्याचे आवाहन शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
शहीद अशोक कामटे संघटनेचे कार्य: एक सामाजिक प्रेरणा!


0 Comments