सांगोला तालुक्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनोद घुगे साहेब यांना शिवणे ग्रामस्थांचा प्रामाणिक समर्थन
सांगोला – वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनोद घुगे साहेब यांची शिवणे गावातील ग्रामस्थांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी, पोलीस निरीक्षक घुगे साहेब
यांच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात आलेल्या कठोर कारवाईची प्रशंसा करण्यात आली.
शिवणे गावचे सोसायटीचे चेअरमन श्री विक्रम घाडगे, मा. उपसरपंच श्री उदयसिंह गाडगे, मित्र श्री शिवाजी राजे घाडगे आणि एपीआय श्री पवन कुमार मोरे उपस्थित होते.
सांगोला तालुका शांततेचा आणि कायद्याचा आदर करणारा तालुका आहे. यापूर्वी काही समाजकंटक व गुंड प्रवृत्तींनी येथील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला होता,
परंतु पोलीस निरीक्षक श्री विनोद घुगे साहेब यांनी त्या व्यक्तींवर कठोर कारवाई करत कायदा व सुव्यवस्था पुनर्स्थापित केली आहे.
त्यांची कार्यशैली प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष असून, त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झाला आहे.
तथापि, काही स्वार्थी लोकांकडून पोलीस निरीक्षक घुगे साहेबांविरुद्ध खोट्या तक्रारींचा प्रयत्न केला जात आहे.
हे अत्यंत निषेधार्ह आहे आणि यामुळे प्रामाणिक अधिकाऱ्यांवर दबाव येण्याची शक्यता आहे, जी कायदा व सुव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम करू शकते.
शिवणे गावचे सर्व ग्रामस्थ श्री विनोद घुगे साहेब यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि त्यांच्या कार्याची पूर्णपणे पाठिंबा देत आहेत.
त्यांनी केलेल्या कारवाईंमध्ये पूर्ण विश्वास असून, आम्ही निवेदनातून प्रशासनाकडून निष्पक्ष चौकशी व योग्य संरक्षणाची मागणी करत आहोत.
सांगोला तालुक्यातील शांतता कायम राखण्यासाठी श्री विनोद घुगे साहेब यांना प्रशासनाचा पूर्ण सहकार्य मिळावे, ही अपेक्षा व्यक्त केली गेली आहे.


0 Comments