google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज.. “बिनबुडाचे आरोप; सांगोल्यातल्याच विरोधी निष्ठावंताची खेळी!” – दीपक आबा साळुंखे पाटील यांचा जोरदार प्रतिउत्तर

Breaking News

ब्रेकिंग न्यूज.. “बिनबुडाचे आरोप; सांगोल्यातल्याच विरोधी निष्ठावंताची खेळी!” – दीपक आबा साळुंखे पाटील यांचा जोरदार प्रतिउत्तर

ब्रेकिंग न्यूज.. “बिनबुडाचे आरोप; सांगोल्यातल्याच विरोधी निष्ठावंताची खेळी!” – दीपक आबा साळुंखे पाटील यांचा जोरदार प्रतिउत्तर 


सांगोला तालुक्यात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर 

माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी ठाम भूमिका घेत सर्व आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी साळुंखे पाटील यांच्यावर 

अशोक खरातच्या मुलीला 32 ते 34 लाख रुपयांचा फ्लॅट ‘गिफ्ट डीड’द्वारे दिल्याचा गंभीर आरोप केला होता. 

मात्र, या आरोपांना उत्तर देताना साळुंखे पाटील यांनी हे सर्व “पूर्णपणे बिनबुडाचे आणि राजकीय हेतूने केलेले” असल्याचे स्पष्ट केले.

👉 दीपक आबा साळुंखे पाटील म्हणाले:

“माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे, निराधार आणि जनतेची दिशाभूल करणारे आहेत.

 माझा अशोक खरातशी कोणताही आर्थिक व्यवहार नाही. कुणाकडे पुरावे असतील तर ते सार्वजनिक करावेत.”

ते पुढे म्हणाले की,

“हे सर्व आरोप सांगोल्यातीलच काही विरोधी निष्ठावंत लोकांकडून पसरवलेल्या चुकीच्या माहितीवर आधारित आहेत. 

राजकीय द्वेषातून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”

⚡ साळुंखे पाटील यांनी स्पष्ट केले की, कार्यक्रमाच्या निमित्ताने कधीतरी भेट झाली असेल,

 मात्र त्यापलीकडे कोणताही संबंध नाही. तसेच त्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशीही मागणी केली.

🔥 दरम्यान, या वक्तव्यामुळे सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, आरोपांमागचे खरे सूत्रधार कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments