Breaking News

सांगोल्यात महिलांसाठी मोठी संधी! 40 मुलींना मिळणार मोफत MSCIT प्रशिक्षण सांगोला नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचा स्तुत्य उपक्रम

सांगोल्यात महिलांसाठी मोठी संधी! 40 मुलींना मिळणार मोफत


MSCIT प्रशिक्षण सांगोला नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचा स्तुत्य उपक्रम

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी) – सांगोला नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या पुढाकारातून शहरातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण व कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात येत आहे.

 शहरातील 40 मुली व महिलांना मोफत MSCIT (एम.एस.सी.आय.टी) चे व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी आवश्यक खर्चास नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे.

नगराध्यक्ष आनंदा माने व महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. छायाताई मेटकरी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की,

 नगरविकास विभागाच्या शासननिर्णयानुसार महिला व बालकल्याणासाठी 5% निधी राखीव ठेवण्यात येतो. त्यानुसार सांगोला नगरपरिषदेच्या अंदाजपत्रकातून सुमारे 12.13 लाख रुपये निधी राखून ठेवण्यात आला आहे.

या निधीतून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार असून, त्यातील पहिल्या टप्प्यात 40 महिलांना MSCIT प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या प्रशिक्षणामध्ये

👉 AI टेक्नॉलॉजी

👉 MS Office (Word, Excel, PowerPoint, Outlook)

👉 इंटरनेट व वेब डिझाइनिंग

यांसारख्या आधुनिक कौशल्यांचा समावेश असणार आहे.

या उपक्रमासाठी अंदाजे 2 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, लवकरच पहिली बॅच सुरू होणार आहे.

इच्छुक महिलांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:

📞 7972100365 / 9503921500

Post a Comment

0 Comments