google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बापानेच केली १७ वर्षीय मुलीची हत्या, नंतर आत्महत्येचा केला बनाव; कारण काय? सोलापूर जिल्ह्यातील घटना..

Breaking News

बापानेच केली १७ वर्षीय मुलीची हत्या, नंतर आत्महत्येचा केला बनाव; कारण काय? सोलापूर जिल्ह्यातील घटना..

बापानेच केली १७ वर्षीय मुलीची हत्या, नंतर आत्महत्येचा केला बनाव; कारण काय? सोलापूर जिल्ह्यातील घटना..


घरातच गळा आवळून हत्या.कीटकनाशक पाजून आत्महत्येचा बनाव करण्याचा प्रयत्न.

सायबर तपासात डिलीट चॅट्स रिकव्हर; आरोपी वडील अटकेत.

सोलापूर:सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या बापानेच १७ वर्षीय मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे.

हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आत्महत्येचा बनाव केला. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली असून न्यायालयाने २ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र त्याने हत्या का केली? सविस्तर वाचा…

काय प्रकरण नेमकं?

श्रावणी राजेंद्र नरसुडे (वय 17) अशी हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. ती बार्शी येथे शिक्षण घेत होती. तिचे एका तरुणाशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याची कुणकुण वडील 

राजेंद्र लालासाहेब नरसुडे (वय 54) यांना लागताच ते संतापले. राजेंद्रने २७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी 10:30 ते 12:30 च्या सुमारास घरातच 

श्रावणीचा तिच्याच ओढणीने गळा आवळून हत्या केला. हत्येनंतर पुरावे लपवण्यासाठी त्याने तिला बळजबरीने कीटकनाशक पाजले, मोबाईलमधील चॅट्स डिलीट केल्या आणि धाराशिव रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

संशय आल्याने प्रकरण समोर

या प्रकरणाची माहिती वैराग्य पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी सुरुवातीला ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली. मात्र पोलिसांना संशय आला आणि तपासाला सुरुवात केली.

 शवविच्छेदन अहवाल समोर येताच श्रावणीच्या मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. सायबर तज्ज्ञांनी डिलीट डेटा रिकव्हर केला तेव्हा संशय अजून वाढला.

पोलिसांनी राजेंद्र याला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी राजेंद्रला पोलिसी खाक्या दाखवले. पोलिसांनी हवालदार संदेश पवार यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली

 असून आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पती-पत्नीचे संशयास्पद मृत्यू; घरात तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत सापडले मृतदेह, आत्महत्या की घातपात

सोलापूर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. राहत्या घरात पती पत्नीचे संशयास्पद मृतदेह आढळून आले आहे. दोघांच्या तोंडातून फेस आल्याने ही घटना आत्महत्या आहे 

की घातपात याबाबत संशय निर्माण झाला आहे. सोमनाथ धानप्पा पाटील आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील असे मृतकाचे नाव आहे. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलावती नगर येथे घडली.

Post a Comment

0 Comments