google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील लोटेवाडी–सोनलवाडी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार ठार

Breaking News

सांगोला तालुक्यातील लोटेवाडी–सोनलवाडी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार ठार

सांगोला तालुक्यातील लोटेवाडी–सोनलवाडी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार ठार


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

 सांगोला : लोटेवाडी ते सोनलवाडी रस्त्यावर फॉरेस्टजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 

२५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिरो कंपनीची मोटारसायकल (क्र. MH-45-AW-1632) चालवत असलेले दाजी सुखदेव गडदे (वय ३४, रा. सावे, ता. सांगोला) 

हे लोटेवाडीहून सोनलवाडीच्या दिशेने जात असताना समोरून रॉंग साईडने येणाऱ्या चारचाकी वाहनाने (क्र. MH-13-AZ-8973) जोरदार धडक दिली. 

या अपघातात गडदे हे गंभीर जखमी झाले असून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तसेच मोटारसायकलीचे सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी फिर्यादी बंडू दगडू गडदे (वय ४५, व्यवसाय शेती, रा. सावे, ता. सांगोला) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चालक सादिक करीम शेख

 (वय ३८, रा. उमरगा, ता. उमरगा, जि. धाराशिव) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६(१), १२५ (अ, ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा क्रमांक १८२/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं. ४.३२ वाजता दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ/१५२ घोंगडे यांच्याकडे सोपविण्यात आला

 असून, गुन्ह्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे. गुन्हा नोंदणीची प्रक्रिया पोहेकॉ/१३७७ येडगे यांनी पूर्ण केली.

या अपघातामुळे सावे गावात हळहळ व्यक्त होत असून, रॉंग साईड वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments