google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अमेरिका–इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात इंधन व गॅस पुरवठ्यावर कडक निर्बंध; तहसील कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक

Breaking News

अमेरिका–इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात इंधन व गॅस पुरवठ्यावर कडक निर्बंध; तहसील कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक

अमेरिका–इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात इंधन व गॅस



पुरवठ्यावर कडक निर्बंध; तहसील कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक

सांगोला : मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या अमेरिका–इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात इंधन व एलपीजी गॅस पुरवठ्याबाबत सतर्कता वाढविण्यात आली आहे. 

संभाव्य परिणामांचा विचार करून सांगोला तालुक्यातही प्रशासनाने खबरदारीची पावले उचलली असून पुरवठा व्यवस्थापन अधिक काटेकोर करण्यात आले आहे.

याच अनुषंगाने दिनांक १७ मार्च २०२६ रोजी दुपारी ४ वाजता सांगोला तहसील कार्यालयात गॅस एजन्सी धारक व पेट्रोल पंप चालकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. 

या बैठकीत इंधन व गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विविध कडक उपाययोजनांवर चर्चा करून स्पष्ट निर्देश देण्यात आले.

बैठकीत सांगोला तालुक्यातील सर्व एलपीजी वितरकांना घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा केवळ होम डिलिव्हरी पद्धतीनेच करण्याचे आदेश देण्यात आले. 

ग्राहकांना थेट गोडाऊन किंवा एजन्सीतून सिलेंडर देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच, केवळ ऑनलाईन बुकिंग केलेल्या व नोंदणीकृत ग्राहकांनाच नियमानुसार गॅस वितरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अनावश्यक साठेबाजी टाळण्यासाठी एका ग्राहकाला एकावेळी एकापेक्षा जास्त सिलेंडर देण्यास स्पष्ट बंदी घालण्यात आली आहे. गॅस वितरण प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखून

 प्रत्येक डिलिव्हरीची नोंद ऑनलाईन प्रणालीत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. सर्व गॅस एजन्सींनी आपली कार्यालये पूर्ण वेळ सुरू ठेवून नागरिकांना अखंड सेवा देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

प्रशासनाने स्पष्ट इशारा देत सांगितले की, कृत्रिम टंचाई निर्माण करणे, साठेबाजी करणे, जादा दराने विक्री करणे किंवा शासनाच्या आदेशांचे उल्लंघन करणे आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

पेट्रोल पंप चालकांनाही याच धर्तीवर कडक सूचना देण्यात आल्या. कोणत्याही ग्राहकास अनावश्यक किंवा नियमबाह्य पद्धतीने पेट्रोल-डिझेल विक्री करू नये,

 साठेबाजी किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करू नये, तसेच जादा दराने विक्री करू नये, असे स्पष्ट करण्यात आले. नागरिकांना नियमित, सुरळीत व पारदर्शक सेवा देण्याचे आवाहन करण्यात आले.

ही बैठक सांगोल्याच्या तहसीलदार बाळूताई भागवत यांच्या आदेशाने घेण्यात आली. बैठकीस पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रांजली गावंडे, गोदाम व्यवस्थापक रवींद्र भड, पुरवठा निरीक्षक प्रियांका जाधव,

 पुरवठा लिपिक सोनाली जाधव यांच्यासह तालुक्यातील सर्व गॅस एजन्सी प्रतिनिधी व पेट्रोल पंप चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, प्रशासनाने नागरिकांनाही आवाहन केले आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व अनावश्यक साठेबाजी टाळावी. सांगोला तालुक्यात इंधन व गॅस पुरवठा सुरळीत

 ठेवण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments