google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 गोरगरीब नागरिकांना कार्यालयात हेलपाटे मारायची वेळ येऊ देऊ नका ; दिपकआबा साळुंखे पाटील सांगोल्यात सभापती आणि उपसभापतीनी स्वीकारला पदभार

Breaking News

गोरगरीब नागरिकांना कार्यालयात हेलपाटे मारायची वेळ येऊ देऊ नका ; दिपकआबा साळुंखे पाटील सांगोल्यात सभापती आणि उपसभापतीनी स्वीकारला पदभार

गोरगरीब नागरिकांना कार्यालयात हेलपाटे मारायची वेळ येऊ देऊ नका ; दिपकआबा साळुंखे पाटील


सांगोल्यात सभापती आणि उपसभापतीनी स्वीकारला पदभार 

सांगोला ; तालुका प्रतिनिधी पंचायत समिती म्हणजे ग्रामीण भागाच्या विकासाचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते. या गोरगरिबांच्या या लोकशाहीच्या पवित्र मंदिरात सांगोला तालुक्यातील गोरगरीब नागरिकांना हेलपाटे मारायची

 वेळ येऊ देऊ नका असा कानमंत्र माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगोला पंचायत समितीच्या भाजपच्या सभापती पूनम इंगवले आणि शिवसेनेचे उपसभापती अजय सरगर यांना दिला. 

गुरुवार दि १९ रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सांगोला पंचायत समितीच्या नूतन सभापती पुनम इंगवले व उपसभापती अजय सरगर यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला यावेळी ते बोलत होते.

 येणाऱ्या काळात पंचायत समितीच्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकांच्या अडचणी त्यांच्या गावात त्यांच्या दारात जाऊन ऐकून त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करायचा त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला नागरिकांच्या अडचणीवर कोणती कारवाई केली याबाबत आढावा बैठक

 घेऊन लोकांना त्याचा खुलासा द्यायचा असा एक राज्याला आदर्शवत असणारा "सांगोला पॅटर्न" तयार करून राज्याच्या समोर ठेवावा अशी अपेक्षा ही यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केली. 

पदग्रहण सोहळ्यानंतर नूतन सभापती व उपसभापतींच्या हस्ते पंचायत समितीच्या विविध योजना अंतर्गत असणाऱ्या लाभार्थ्यांना धनादेशाचे तसेच दिव्यांग बांधवांना त्यांच्यासाठी उपयोगी असणाऱ्या साधनांचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयमलाताई गायकवाड,

 भाजपचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य चेतनसिंह केदार, युवासेनेचे संपर्कप्रमुख सागर पाटील, बाळासाहेब एरंडे, भाऊसाहेब रुपनर, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, माजी सभापती संभाजी आलदर, 

बाळासाहेब काटकर, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे, शोभाताई खटकाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख जेष्ठ नेते तानाजी काका पाटील अनिल खडतरे, शिवाजीराव गायकवाड पंचायत समिती सदस्य राणी पाटील, सोनाली पाटील, 

बाळासाहेब बंडगर, अशोक चोरमुले, बापू जावीर, व डॉ सदाशिव दबडे आदीसह गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी आणि पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी तसेच महायूतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments