Breaking News

खळबळजनक..मेडशिंगीजवळ दिवसाढवळ्या चोरी: मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्याची रोख रकमेची बॅग लंपास

खळबळजनक.. सांगोला तालुक्यातील मेडशिंगीजवळ दिवसाढवळ्या चोरी: मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्याची रोख रकमेची बॅग लंपास


 सांगोला :- मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत भिवाजी कोळी (वय २४, रा. सौंदणे, ता. मोहोळ) हे 'क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण 

लिमिटेड' या मायक्रो फायनान्स कंपनीत नोकरीला आहेत. दिनांक २ मार्च २०२६ रोजी दुपारी १२:४५ च्या सुमारास ते वसुलीची रक्कम 

59,806 रुपये गोळा करून सांगोला येथील आपल्या ऑफीसला परतत होते. मेडशिंगी गावापासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर पोहोचल्यावर

 त्यांची मोटारसायकल अचानक बंद पडली. गाडी का बंद पडली, हे पाहण्यासाठी प्रशांत कोळी रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून खाली वाकून इंजिन तपासत होते. 

त्याच वेळी, मेडशिंगी गावाकडून एक अज्ञात दुचाकीस्वार आला. त्याने अतिशय शिताफीने प्रशांत यांच्या गाडीच्या टाकीवर ठेवलेली बॅग चोरली आणि घटनास्थळावरून पळ काढला.

या घटनेनंतर प्रशांत कोळी यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 पोलीस निरीक्षक घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना/वाकीटोळ हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments