google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ५० वर्षांची शेकापची सत्ता खल्लास! सांगोला पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा; पूनम इंगवले सभापती, अजय सरगर उपसभापती

Breaking News

५० वर्षांची शेकापची सत्ता खल्लास! सांगोला पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा; पूनम इंगवले सभापती, अजय सरगर उपसभापती

५० वर्षांची शेकापची सत्ता खल्लास! सांगोला पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा; पूनम इंगवले सभापती, अजय सरगर उपसभापती


सांगोला : तालुक्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवत सांगोला पंचायत समितीवरील शेकापची तब्बल पन्नास वर्षांची सत्ता अखेर कोसळली. 

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यमय राजकीय हालचालींनंतर महायुतीने पंचायत समितीवर सत्ता स्थापन करत इतिहास घडवला. 

भाजपच्या पूनम इंगवले यांची सभापतीपदी तर शिवसेनेचे अजय सरगर यांची उपसभापतीपदी निवड झाली.

जि.प. व पंचायत समिती निवडणुकीत शेकाप आणि माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या गटाची आघाडी झाली होती. 

या आघाडीला पंचायत समितीत ९ जागा मिळाल्या होत्या, तर विरोधातील शिवसेना-भाजप युतीला

 फक्त ५ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे सुरुवातीला सत्ता शेकाप आघाडीच्या हाती जाणे निश्चित मानले जात होते.

मात्र, राजकीय पडद्यामागील हालचालींनी सगळे गणितच बदलले. साळुंखे-पाटील गटातील तीन सदस्यांनी मुंबईत भाजपत प्रवेश केला 

आणि याच क्षणी पंचायत समितीतील सत्तेचे समीकरण पूर्णपणे उलथले. 

शेकाप आघाडीची ताकद ९ वरून ६ वर आली, तर भाजप-शिवसेना मिळून ८ सदस्यांचे स्पष्ट बहुमत तयार झाले.

सभापतिपदासाठी भाजपच्या पूनम इंगवले तर उपसभापतीपदासाठी शिवसेनेचे अजय सरगर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

त्यांच्या विरोधात शेकापच्या काजल काशीद (सभापती) आणि छाया कोळेकर (उपसभापती) यांनी अर्ज भरला. 

मतदानानंतर महायुतीच्या ८ सदस्यांनी एकजुटीने इंगवले आणि सरगर यांच्या बाजूने मतदान करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

यामुळे ८ विरुद्ध ६ अशा फरकाने पंचायत समितीवर महायुतीची सत्ता प्रस्थापित झाली आणि सांगोल्यात शेकापचे दीर्घकाळ टिकलेले वर्चस्व एका झटक्यात संपुष्टात आले.

निवडीनंतर पंचायत समिती कार्यालयासमोर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण 

आणि हलगीच्या निनादात जल्लोष साजरा केला. “सांगोल्यात बदलाची नवी सुरुवात झाली,” अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली.

नगरपालिकेनंतर पंचायत समितीही हातातून

स्व. गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर झालेल्या सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीतही शेकापला सत्ता मिळवता आली नव्हती. 

त्या वेळी शिवसेनेने नगराध्यक्षपद पटकावत सत्ता स्थापन केली होती. आता पंचायत समितीची सत्ता देखील हातातून गेल्याने सांगोल्यात शेकापचे राजकीय वर्चस्व ढासळल्याचे स्पष्ट चित्र दिसू लागले आहे.

साळुंखे-पाटील ठरले ‘किंगमेकर’

या निवडणुकीत भाजपचा फक्त एकच सदस्य निवडून आला होता. मात्र साळुंखे-पाटील गटातील तीन सदस्य भाजपमध्ये दाखल

 झाल्यानंतर भाजपची संख्या चारवर पोचली. शिवसेनेचे चार सदस्य मिळून महायुतीकडे ८ सदस्यांचे बहुमत तयार झाले आणि त्याच बळावर सभापतिपद भाजपच्या झोळीत पडले.

या संपूर्ण घडामोडींमुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या राजकीय रणनीतीची चर्चा रंगली असून, माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील 

हेच या सत्ताबदलाचे खरे ‘किंगमेकर’ ठरल्याची चर्चा सांगोल्याच्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

Post a Comment

0 Comments