google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लावणी मरेपर्यंत तरूणच हाय.'चाळानं माझी भूक जाणली. 'स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी या लावणी स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन

Breaking News

लावणी मरेपर्यंत तरूणच हाय.'चाळानं माझी भूक जाणली. 'स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी या लावणी स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन

लावणी मरेपर्यंत तरूणच हाय.'चाळानं माझी भूक जाणली.


'स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी या लावणी स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन

अकलूज - ' काय केला हो तुमचा गुन्हा, तुम्हा वाचून जीव माझा सुना ' म्हणत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती आयोजित

 २९ वी राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाच्या सादरीकरणाची सुरुवात वैष्णवी कोल्हापूरकर रेणुका सांस्कृतिक कला केंद्र अंबप वाठार जि.कोल्हापूर यांनी रसिकांना ठेका धरायला लावला.

दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, आजच्या नृत्य स्पर्धेनिमित्त प्रमुख पाहुणे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,माजी मंत्री आमदार दिलीप सोपल,

 पद्मश्री पुरस्कार प्राप्त तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, जयंती समारंभ समितीचे संस्थापक जयसिंह मोहिते पाटील, प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुजरा,गवळण, बैठकीची लावणी, छक्कड व जुगलबंदी या पारंपारिक लावणी प्रकाराच्या सादरीकरणातून वैष्णवी कोल्हापूरकर रेणुका संस्कृती कला केंद्राच्या लावण्यवतींनी आपल्या 

अदाकारीने रसिकांना भुरळ घातली. नृत्याला अभिनयाची जोड देत, ढोलकी व घुंगराची जुगलबंदी सादर करत महाराष्ट्राचा लोककलेचा वारसा या स्पर्धेत छाया, पूजा, श्रद्धा कोल्हापूरकर रेणुका संस्कृती कला केंद्र अंबप वाठार जिल्हा कोल्हापूर, 

राजनंदिनी सांस्कृतिक कला केंद्र यवत चौफुला जि पुणे, यांनी अतिशय सुंदर सादरीकरण करत प्रेक्षकांची मने जिंकली तर गायिका अस्मिता वर्मा यांनी आपल्या सुरेल आवाजात लावली गायन केले वैष्णवी कोल्हापूरकर अतिशय सादरीकरण चांगले केले

 नटरंग सांस्कृतिक कला केंद्र मोडनिंब,जि. सोलापूर, प्रिया नगरकर न्यू सांस्कृतिक कला केंद्र यवत चौफुला जि पुणे, रुक्मिणी, अर्चना,ज्योत्स्ना वाईकर पिंजरा सांस्कृतिक कला केंद्र वेळे जि. सातारा यांच्या अप्रतिम सादरीकरणातून जपल्याने रसिक मंत्रमुग्ध झाले.

पद्मश्री पुरस्कार प्राप्त रघुवीर खेडकर यांचा सन्मान जयंती समारंभ समितीच्या वतीने संस्थापक जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

 याप्रसंगी जयसिंह मोहिते पाटील यांनी कलाकार हा सन्मान व टाळ्याचा भुकेला असतो, रसिकांनी तो भरभरून द्यावा अशी इच्छा व्यक्त केली.

महाराष्ट्रामध्ये शिस्तबद्ध व परंपरेला वाव देणारी अकलूजची एकमेव लावणी स्पर्धा असून, १९९३ पासून सुरू झालेली हे परंपरा दरवर्षी नाविन्य जपतेय असे सांगत स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी या लावणी स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन करीत हे शिवधनुष्य पेलल्याची बाब कौतुकास्पद आहे.

 लावणीचे आधारवड जयसिंह मोहिते पाटील यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा ही कलावंतांची मागणी व या स्पर्धेतील कलावंतांना मानधन मिळावे ही बाळदादांची मागणी शासन दरबारी पोहोचवेन.

- आमदार दिलीप सोपल.

Post a Comment

0 Comments