google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

Breaking News

धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले


मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथे एका 20 वर्षीय मुलीने अज्ञात कारणावरुन विष प्राशन केल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या घटनेची मंगळवेढा पोलीसात नोंद झाली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील 20 वर्षीय तरुणी दिक्षा कुमार पवार हिने अज्ञात कारणावरुन दि.7 फेबु्रवारी रोजी दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान पॅराकेव्ह विषारी औषध प्राशन केले.

सदर मुलीस उलट्या झाल्याने पुढील उपचारासाठी सोलापूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी ती तरुणी शुध्दावस्थेत होती.

दि.14 फेबु्रवारी रोजी 2.56 वाजता ती उपचारादरम्यान मयत झाली आहे. या घटनेची नोंद मंगळवेढा पोलीसात झाली असून याचा अधिक तपास बोराळे बीटचे पोलीस हवालदार नवले हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments