google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 3 मार्चला ग्रहणातच चंद्र उगवणार; भीती नव्हे तर विज्ञानाची किमया, तज्ज्ञांचा सल्ला

Breaking News

3 मार्चला ग्रहणातच चंद्र उगवणार; भीती नव्हे तर विज्ञानाची किमया, तज्ज्ञांचा सल्ला

3 मार्चला ग्रहणातच चंद्र उगवणार; भीती नव्हे तर विज्ञानाची किमया, तज्ज्ञांचा सल्ला


येत्या मंगळवारी 3 मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण हे ग्रहणातच चंद्र उगवतांना पाहण्याची दुर्मीळ संधी देणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक व पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली आहे. 

चंद्रग्रहण हा पूर्णपणे नैसर्गिक अविष्कार असून तो साध्या डोळ्यांनी सुरक्षितपणे पाहता येतो

काही प्रसारमाध्यमांतून या ग्रहणाबाबत भीतीचे वातावरण निर्माण केले जात असले तरी त्याला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

हे विज्ञानयुग असल्याने शिक्षक आणि पालकांनी मुलांना चंद्रग्रहण दाखवून त्यामागील विज्ञान समजावून सांगावे, असेही ते म्हणाले.

जेव्हा चंद्र पृथ्वीच्या दाट छायेत प्रवेश करतो तेव्हा त्याचे बिंब काळसर-लालसर दिसते. पृथ्वीच्या ज्या भागातून चंद्र दृश्य आकाशात असतो, तेथून हे दृश्य अनुभवता येते. 3 मार्च रोजी दुपारी 3.20 वाजता ग्रहणास प्रारंभ होईल; 

मात्र त्या वेळी चंद्र पूर्व क्षितिजाखाली असल्याने तो दिसणार नाही. सायंकाळी चंद्रोदयाच्या वेळीच ग्रहण सुरू असलेला चंद्र पाहायला मिळणार आहे. सर्वत्र सायं. 6.48 वाजता ग्रहण सुटणार आहे.

मुंबईत चंद्रोदय सायं. 6.45 वाजता होईल आणि 6.48 वाजता ग्रहण समाप्त होणार असल्याने अवघ्या तीन मिनिटांत हे दृश्य पाहता येईल. पुणे येथे 6.41, नाशिक 6.40, कोल्हापूर 6.40, नागपूर 6.18, सोलापूर 6.33, रत्नागिरी 6.44 आणि छत्रपती संभाजीनगर येथे 6.34 वाजता चंद्रोदय होणार आहे.

 त्या-त्या ठिकाणी चंद्रोदयापासून 6.48 पर्यंत ग्रहण दिसेल. ग्रहणवेधकाळात धूलीवंदन व होळीचा रंगोत्सव साजरा करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments