google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..२४ तासांत दरोडेखोर जेरबंद! सांगोला पोलिसांची धडाकेबाज कारवाई पोलीस निरीक्षक मा. विनोद घुगे

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..२४ तासांत दरोडेखोर जेरबंद! सांगोला पोलिसांची धडाकेबाज कारवाई पोलीस निरीक्षक मा. विनोद घुगे

ब्रेकिंग न्यूज..२४ तासांत दरोडेखोर जेरबंद! सांगोला पोलिसांची धडाकेबाज कारवाई पोलीस निरीक्षक मा. विनोद घुगे


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोल्यात दरोडेखोरांचा शेवट! २४ तासांत पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ 

सांगोला (प्रतिनिधी) : सांगोला-पंढरपूर मार्गावर झालेल्या धाडसी दरोड्याच्या घटनेचा अवघ्या २४ तासांत छडा लावत 

सांगोला पोलिसांनी चार आरोपींना अटक करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या कारवाईमुळे तालुक्यात पोलिसांच्या कार्यक्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

दिनांक २१ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पंढरपूर ब्रिज पुढे एका काळ्या रंगाच्या विना नंबर थार गाडीतून आलेल्या चार अज्ञात इसमांनी फिर्यादी दिलीप भागोजी पाटील 

(वय ५८, रा. भोगम कॉलनी, चिंचवड, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांच्या गाडीला कट मारत जबरदस्तीने अडवले. त्यानंतर दमदाटी व शिवीगाळ करून त्यांच्या डिकीतून दोन बॅगा पळवून नेल्या. 

त्यामध्ये २ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम, चालकाचे दोन मोबाईल फोन तसेच आधारकार्ड, पॅनकार्ड व विविध बँकांचे एटीएम कार्ड असा ऐवज लंपास करण्यात आला.

या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गु.र. नं. २५६/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०९(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास पथके तयार करण्यात आली.

 गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे वापरण्यात आलेली थार गाडी कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले. 

स्थानिक पोलिसांच्या मदतीने गाडीचा मालक गौशपाक उर्फ मुन्ना अब्दुलरजाक जमादार (रा. कोरोची, जि. कोल्हापूर) याला ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत या गुन्ह्यातील धक्कादायक बाब समोर आली. फिर्यादीचा स्वतःचा चालक रामचंद्र बापू सांळुखे (रा. सांगली, सध्या कोल्हापूर) 

हा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यासह संदिप मेडगुळे, महेश कांबळे व इतर साथीदारांनी मिळून हा कट रचल्याचे स्पष्ट झाले.

पोलीसांनी चार आरोपींना अटक करून २६ मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोउपनि सागर पाटील करीत आहेत.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

सांगोला पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. 🔥🚔

Post a Comment

0 Comments