google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..सोलापूर जिल्ह्यातील ६५५ गावांच्या प्रभाग रचनेला मंजुरी; निवडणुकीची रणधुमाळी सुरू!

Breaking News

मोठी बातमी..सोलापूर जिल्ह्यातील ६५५ गावांच्या प्रभाग रचनेला मंजुरी; निवडणुकीची रणधुमाळी सुरू!

मोठी बातमी..सोलापूर जिल्ह्यातील ६५५ गावांच्या प्रभाग रचनेला मंजुरी; निवडणुकीची रणधुमाळी सुरू!


सोलापूर : जिल्ह्यातील ६५५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावाला विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मंजुरी दिली आहे.

 या निर्णयामुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग आला असून, आगामी निवडणुकांची रंगत वाढली आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. 

जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींचा या टप्प्यात समावेश असल्याने सर्वच राजकीय पक्ष आणि स्थानिक नेत्यांचे लक्ष या प्रक्रियेवर केंद्रीत झाले आहे.

या टप्प्यात सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांतील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामध्ये बार्शी तालुका सर्वाधिक ग्रामपंचायतींसह आघाडीवर आहे. 

तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या पुढीलप्रमाणे आहे — बार्शी: ९५, माढा: ८३, मोहोळ: ७२, पंढरपूर: ७२, अक्कलकोट: ७२, 

सांगोला: ६२, दक्षिण सोलापूर: ५२, करमाळा: ५१, माळशिरस: ४९, उत्तर सोलापूर: २४ आणि मंगळवेढा: २३.

प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आता प्रभागनिहाय मतदार याद्यांचे विभाजन करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.

पुढील कार्यक्रम असा असेल :

३० मार्च : प्रभाग रचनेचा प्रस्ताव संबंधित तहसीलदारांकडे पाठविणे

७ एप्रिल : प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे

७ ते १३ एप्रिल : दावे व हरकती स्वीकारणे

१६ ते २१ एप्रिल : प्रांताधिकाऱ्यांकडे सुनावणी

४ मे : अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध

या संपूर्ण प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील राजकारणाला वेग येणार असून, गावपातळीवरील समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments