Breaking News

ब्रेकिंग न्यूज...पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ

ब्रेकिंग न्यूज...पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ


सोलापूर : पंढरपूर शहरात एका ट्रक चालकाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

 सांगोला मार्गावरील चौकात हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात येत असून, या घटनेमुळे वाहतूक शाखेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये अवजड वाहन चालकाला पोलिसांकडून मारहाण होत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र पोलिसांनी हा आरोप फेटाळत नो एन्ट्रीचे उल्लंघन केल्याने नियमानुसार कारवाई केल्याचा दावा केला आहे.

सदर ट्रक चालकाने नो एन्ट्रीमध्ये वाहन आणल्यामुळे पोलिसांनी दोन हजार रुपये घेतले, मात्र त्याची पावती दिली नाही, असा गंभीर आरोप केला आहे. 

पुढे काही अंतर गेल्यानंतर चालकाच्या मोबाईलवर एक हजार रुपयांच्या दंडाचा मेसेज आल्याचं त्याने सांगितलं.

याबाबत विचारणा करण्यासाठी चालक परत चौकात आला असता पोलिसांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

ही घटना घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) मोहोळचे आमदार राजाभाऊ खरे त्या मार्गाने जात होते. त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली.

 स्थानिक नागरिकांनीही वाहतूक शाखेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

पंढरपूर शहरचे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी मात्र चालकाने नो एन्ट्रीचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि पावतीही देण्यात आल्याचा दावा केला आहे. मारहाणीच्या आरोपांबाबत त्यांनी भाष्य करण्याचे टाळले आहे.

दरम्यान, हा मुद्दा सुरू असलेल्या अधिवेशनात मांडणार असल्याचा दावा आमदार राजाभाऊ खरे यांनी केला आहे. या संपूर्ण घटनेमुळे पंढरपूरमध्ये पोलिसांच्या कारवाईवरून नव्याने वाद निर्माण झाला असून पुढील चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments