google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महिला दिनानिमित्त ‘मिस अँड मिसेस सांगोला-2026’ स्पर्धा जल्लोषात डॉ. निकिताताई देशमुख उपस्थित संपन्न..

Breaking News

महिला दिनानिमित्त ‘मिस अँड मिसेस सांगोला-2026’ स्पर्धा जल्लोषात डॉ. निकिताताई देशमुख उपस्थित संपन्न..

महिला दिनानिमित्त ‘मिस अँड मिसेस सांगोला-2026’ स्पर्धा जल्लोषात डॉ. निकिताताई देशमुख उपस्थित संपन्न..

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला/प्रतिनिधी महिला दिनाचे औचित्य साधत श्री चौडेश्‍वरी देवांग कोष्टी महिला मंच, सांगोला यांच्या वतीने आयोजित ‘मिस अँड मिसेस सांगोला-2026’ ही स्पर्धा 

मंगळवार दि. 3 मार्च 2026 रोजी दुपारी 12 वाजता अहिल्याबाई होळकर सभागृह (टाऊन हॉल), सांगोला येथे उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमास शहरातील महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या स्पर्धेला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. निकिताताई देशमुख उपस्थित होत्या. परीक्षक म्हणून सौ. सायली होगाडे व कु. लौकिता लालबेग यांनी स्पर्धकांचे परीक्षण केले. 

गेले तीन वर्षे हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून येथून पुढे अधिक मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम घेण्यात येईल, असे मंचाच्या अध्यक्षा यांनी यावेळी सांगितले.

स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी रु. 5000/- व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी रु. 3000/-, तृतीय क्रमांकासाठी रु. 2000/- व चतुर्थ क्रमांकासाठी रु. 1000/- तसेच सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. 

बेस्ट वेशभूषा, बेस्ट टॅलेंट आणि बेस्ट व्यक्तिमत्व या विशेष किताबांसाठी गिफ्ट हॅम्पर व सन्मानचिन्ह देण्यात आले. लकी ड्रॉद्वारे एकूण 10 आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

स्पर्धेतील विशेष किताब विजेत्यांमध्ये बेस्ट वेशभूषा – ऐश्‍वर्या बनकर, बेस्ट टॅलेंट – सौ. कल्याणी सपाटे, बेस्ट व्यक्तिमत्व – पुनम सावंत यांचा समावेश आहे. 

थर्ड रनरअप ललिता चौधरी, सेकंड रनरअप सौ. मयुरी कांबळे, फर्स्ट रनरअप सौ. स्मिता चव्हाण तर ‘मिस अँड मिसेस सांगोला-2026’ या स्पर्धेची विजेती कु. सेजल कवठेकर ठरली.

कार्यक्रमासाठी सूर्योदय परिवार, श्री चांडोले, श्री घोंगडे, ट्रॅक्टर्स टीव्हीएस, श्रुती कन्स्ट्रक्शन, अर्चना स्किन केअर क्लिनिक, श्री जी ज्वेलर्स आदींनी बक्षीस दाते म्हणून सहकार्य केले. परीक्षक सौ. सायली होगाडे व कु. लौकिता लालबेग यांचेही विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमस्थळी सौ. रेशमा दिवटे व सौ. रूपाली कुरकुटे यांनी साकारलेल्या सुंदर रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रांगोळी पाहण्यासाठी महिला वर्गाने मोठी गर्दी केली होती.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पूनम कांबळे, सौ. अश्‍विनी कांबळे, सौ. सविता लाटणे यांनी केले तर सौ. स्नेहा कुमठेकर यांनी आभार प्रदर्शन केले.

डॉ. निकिताताई देशमुख यांनी आपल्या मनोगतात महिलांनी आपल्या आरोग्याची व शरीराची योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. 

सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करत आयोजकांचे आभार मानले. महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Post a Comment

0 Comments