google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पंढरपूरात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा मार्ग मोकळा; सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा

Breaking News

पंढरपूरात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा मार्ग मोकळा; सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा

पंढरपूरात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा मार्ग मोकळा; सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा


सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील वाढता प्रशासकीय ताण आणि 

जिल्ह्याचा मोठा भौगोलिक विस्तार लक्षात घेऊन राज्य शासनाने सोलापूरसाठी नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर केले आहे.

 हे कार्यालय पंढरपूर येथे सुरू होण्याची शक्यता असून त्यामुळे पंढरपूर, माळशिरस, माढा आणि सांगोला या तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये महसूल विभागाच्या कामकाजाचा ताण वाढत असल्याने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात ११ अप्पर जिल्हाधिकारी 

कार्यालयांना मंजुरी दिल्याची घोषणा विधानसभेत केली. या मंजुरीमध्ये सोलापूर जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार मोठा असल्याने महसूल विभागाशी संबंधित प्रकरणांचा ताणही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. 

जमीन विषयक प्रकरणे, महसूल विभागाच्या सुनावण्या तसेच विविध प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार 

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जावे लागते. त्यामुळे अनेकदा नागरिकांना मोठी प्रतीक्षा करावी लागत होती.

पंढरपूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाल्यानंतर महसूल विभागातील 

विविध प्रकरणांची सुनावणी, जमीन विषयक कामे आणि प्रशासकीय निर्णय प्रक्रिया अधिक वेगाने होणार आहे.

 यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावरील ताण कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांची कामेही जलदगतीने मार्गी लागतील.

विशेषतः पंढरपूर, माळशिरस, माढा आणि सांगोला या तालुक्यातील नागरिकांना सोलापूरपर्यंत प्रवास करण्याची गरज

 कमी होणार असल्याने वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे नागरिकांमधून स्वागत केले जात आहे.

Post a Comment

0 Comments