google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..नाझरे येथे शॉर्टसर्किटने घराला भीषण आग सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान : पाटील कुटुंब उघड्यावर

Breaking News

खळबळजनक..नाझरे येथे शॉर्टसर्किटने घराला भीषण आग सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान : पाटील कुटुंब उघड्यावर

खळबळजनक..नाझरे येथे शॉर्टसर्किटने घराला भीषण आग सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान : पाटील कुटुंब उघड्यावर


सांगोला -नाझरे (ता. सांगोला) येथील रायाप्पा रामचंद्र पाटील यांच्या राहत्या घराला शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीत संपूर्ण घर जळून भस्मसात झाल्याने पाटील कुटुंब उघड्यावर पडले आहे.

 शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत कपडे, भांडी, सोने, चांदी दागिन्यांसाह रोख रक्कम, अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य जळून सुमारे ४० लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या

सुमारास नाझरे येथे घडली. या घटनेचा पंचनामा मंडलाधिकारी हरिश्चंद्र जाधव, गाव कामगार तलाठी राजेंद्र जाधव, पोलीस पाटील लक्ष्मण बनसोडे यांनी केला आहे.

नाझरे (ता. सांगोला) येथील रायापा पाटील हे नाझरे गावात वास्तव्यास आहेत. त्यांचे घर धाब्याचे होते. 

मनोज रायाप्पा पाटील यांनी डाळिंब विकून आलेले पैसे घरातील कपाटात ठेवले होते. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन अचानक घराला आग लागली.

 आग एवढी भीषण होती की घरातील सर्व वस्तू तर जळाल्या परंतु घराच्या वर असलेले खांडे दांडे, पत्रे सुद्धा जळून खाक झाले पण सुदैवाने घरातील सर्व मंडळी बाहेर

पडल्याने मनुष्यहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच पाटील परिवार, मित्रपरिवार, ग्रामस्थ यांनी

अग्निशामक दलाला पाचारण केले व आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले.

टीव्ही, फ्रिज, एसी, पंखे आदींसह अनेक बिद्युत उपकरणे जळून खाक झाली. पाटील कुटुंबाची सर्व गुजराण शेतीवर असून परिस्थिती बेताची आहे,

 तरी राजकीय, व्यक्तींनी, दानशूर व्यक्तींनी, सामाजिक संस्थांनी कुटुंबाला सढळ हाताने मदत करावी व शासकीय विभागानेही पाटील कुटुंबीयांना जास्तीत जास्त नुकसान मिळण्यासाठी मदत करावी.

 तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन तातडीने मदत मिळवून द्यावी असे नागरिकांतून बोलले जात आहे. सध्या तरी हे कुटुंब उघड्यावर पडले आहे व त्यांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments