google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सूर्योदय परिवाराच्या वतीने रविवारी जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन दुर्गाशक्ती आणि मातृशक्ती पुरस्काराचे सौ. सोनियाताई गोरे यांच्या हस्ते होणार वितरण

Breaking News

सूर्योदय परिवाराच्या वतीने रविवारी जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन दुर्गाशक्ती आणि मातृशक्ती पुरस्काराचे सौ. सोनियाताई गोरे यांच्या हस्ते होणार वितरण

सूर्योदय परिवाराच्या वतीने रविवारी जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन


दुर्गाशक्ती आणि मातृशक्ती पुरस्काराचे सौ. सोनियाताई गोरे यांच्या हस्ते होणार वितरण

सांगोला / प्रतिनिधी... महाराष्ट्रभर अनेक प्रकारचे उद्योग, व्यवसाय आणि आर्थिक संस्था कुशलतेने चालवणाऱ्या सूर्योदय परिवाराच्या तसेच सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला 

दिनाच्या निमित्ताने रविवार दिनांक 15 मार्च रोजी दुपारी बारा वाजता सांगोला शहरातील वाढेगाव रोडवरील सूर्योदय बँक्वेट हॉल येथे 'सन्मान स्त्री शक्तीचा आणि गौरव अभिमानाचा' हा कार्यक्रम संपन्न होणार 

असल्याची माहिती सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक आणि एलकेपी मल्टीस्टेटचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांनी दिली. या कार्यक्रमांमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागातून काही कर्तृत्व संपन्न महिलांना आणि कर्तुत्व संपन्न पिढी निर्माण करणाऱ्या काही आदर्श मातांना

 पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या सुविध्य पत्नी आणि भाजपाच्या राज्य कार्यकारिणी सदस्या सौ सोनियाताई गोरे यांच्या शुभहस्ते विविध पुरस्कारांचे वितरण होणार 

असून कोल्हापूर येथील हास्यसम्राट संभाजी यादव यांचा 'जगण्यासाठी हसा आणि हसण्यासाठी जगा' या कार्यक्रमाचे देखील यावेळी आयोजन केले असल्याची माहिती सूर्योदय महिला अर्बनच्या चेअरमन सौ अर्चनाताई इंगवले यांनी दिली. या कार्यक्रमासाठी 

सौ रुपमती दीपकराव साळुंखे पाटील, डॉ सौ निकिताताई बाबासाहेब देशमुख, पंचायत समितीच्या सदस्या सौ राणीताई सुरज पाटील आणि नगरसेविका सौ सुजाता चेतनसिंह केदार इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहितीही

 सौ इंगवले यावेळी दिली. अवघ्या जगाची निम्मी लोकसंख्या असलेल्या महिलांच्या यशाचा, कौटुंबिक आणि सामाजिक योगदानाचा गौरव करणे तसेच त्यांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा सन्मान करत लिंग समानतेचा संदेश देणारा

 एक जागतिक उत्सव म्हणून 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' गेल्या अनेक वर्षांपासून जगभर साजरा करण्यात येतो. समानतेचा हक्क आणि शिक्षण याबाबतीत जागृती होऊन महिलांचे सक्षमीकरण करणे हा उदात्त हेतू या पाठीमागे आहे. 

अर्थकारण, कृषी आणि सहकार यामध्ये उद्योगांचे जाळे उभा करत तितक्याच तोलामोलाचे समाजकारण करणारा आणि सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत सातत्याने गुणगौरवाची परंपरा जपणाऱ्या सूर्योदय परिवाराकडून यावर्षी शिक्षण, नोकरी, व्यवसाय, कृषी अशा

 कोणत्याही क्षेत्रामध्ये स्वतः कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या महिलांना 'दुर्गाशक्ती' हा पुरस्कार देऊन आणि अधिकारी, डॉक्टर तसेच कुठल्याही क्षेत्रामध्ये उत्तुंग कार्य करणारी पिढी घडवणाऱ्या आदर्श मातांना 'मातृशक्ती' हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.

 या कार्यक्रमासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सूर्योदय महिला अर्बनच्या व्हॉ. चेअरमन सौ ज्योती भगत, संचालिका सौ सुरेखाताई लवटे आणि सौ मीनाक्षीताई दिघे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments