Breaking News

सूनेमुळे सासऱ्यानं संपवलं जीवन; तपासात समोर आलं धक्कादायक कारण सोलापूर जिल्ह्यातील घटना..

सूनेमुळे सासऱ्यानं संपवलं जीवन;


तपासात समोर आलं धक्कादायक कारण सोलापूर जिल्ह्यातील घटना..


सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्याने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडलीय.

 73 वर्षीय वृद्ध व्यक्तीनं सकाळी उपळाई रोडवरील नाईकवाडी प्लॉट येथे आत्महत्या केली. सर्जेराव शंकर नायकुडे, असं आत्महत्या केलेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे.

 या घटनेनं खळबळ उडाली आहे. बार्शी शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद देण्यात आली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मृत व्यक्तीचा मुलगा आणि सूनेविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्जेराव शंकर नायकुडे आणि फिर्यादी त्यांचा मुलगा हे बार्शीतील नाईकवाडी प्लॉट येथील स्वतःच्या बंगल्यात राहत होते. तर फिर्यादीचा भाऊ व त्याची पत्नी हे काही महिन्यांपासून कुर्डुवाडी रोड परिसरात राहत आहेत. 

गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे सासरे हे त्यांच्याकडे राहत होते. तेव्हा सून त्यांना किरकोळ कारणावरून सतत अपमानित करत. सासऱ्यांना मानसिक त्रास देत होती. त्यामुळे सासरे हे मानसिक तणावात होते.

 अखेर सततच्या त्रासाला कंटाळून ते नाईकवाडी प्लॉट बार्शी येथे आले. त्यांनी मंगळवारी टोकाचा निर्णय घेत विषारी द्रव्य पिऊन जीवन संपवले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments