सांगोल्यात ‘ऑपरेशन लोटस’चा स्फोट! तीन पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये;
गोरे यांच्या नेतृत्वाखाली व दिपकआबा यांच्या उपस्थितीत मोठी राजकीय उलथापालथ
सांगोला ; तालुका प्रतिनिधी गुरुवार दि. १२ मार्च रोजी सांगोला पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवड पार पडणार आहेत. तत्पूर्वीच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारभाऊ गोरे यांनी जोरदार
राजकीय मास्टरस्ट्रोक खेळत सांगोला तालुक्यात प्रथमच "ऑपरेशन लोटस" मोहीम यशस्वी करून माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या तिन्ही पंचायत समिती सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला आहे.
मुंबई येथे पालकमंत्री जयकुमारभाऊ गोरे यांच्याहस्ते आणि दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश संपन्न झाला.
सांगोला पंचायत समिती सभापती उपसभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या
निवासस्थानी पालकमंत्री जयकुमारभाऊ गोरे, तालुक्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील, भाजपचे नेते बाळासाहेब एरंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार,
माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव शिंदे यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेतेमंडळींची समन्वय बैठक संपन्न झाली.
या बैठकीत सांगोला पंचायत समितीच्या सभापतीपदाची संधी प्रथम भारतीय जनता पक्षाला देण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
तर, त्यानंतर शिवसेनेचा सभापती होणार असल्याचेही या समन्वय बैठकीत सर्वानुमते ठरले आहे.
महायुतीच्या नेतेमंडळींनी घेतलेल्या या निर्णयानुसारच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोला तालुक्यात "ऑपरेशन लोटस" मोहीम यशस्वीपणे राबविली आहे.
जवळा पंचायत समिती गणातून पूनम इंगवले, घेरडी गणातून अशोक चोरमुले आणि अजनाळे गणातून बापू जावीर हे तीन उमेदवार सांगोला पंचायत समितीच्या निवडणुकीत विजयी झाले होते.
तर महायतीचे ५ आणि शेकापचे ६ उमेदवार विजयी झाले होते. सभापती उपसभापती निवडीच्या पूर्वीच भाजपने ३ सदस्यांचा भाजप प्रवेश घडवून
आणत पालकमंत्री जयकुमारभाऊ गोरे यांनी पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा सभापती आणि
शिवसेनेचा उपसभापती करण्याची सूचना दिली. तर, दुसऱ्यावेळी शिवसेनेचा सभापती आणि भाजपचा उपसभापती करण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर झाला.
यानुसार प्रथम भाजपच्या सभापती पूनम इंगवले तर शिवसेनेचा उपसभापती अजय सरगर यांची निवड निश्चित करण्यात आली आहे.
त्यामुळे सांगोला तालुक्यातील शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सांगोल्यात पहिल्यांदाच भाजपचा सभापती तर शिवसेनेचा उपसभापती सांगोला
पंचायत समितीच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच भाजप महायुतीचा सभापती होणार आहे.
नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जवळा पंचायत समिती गणातील सदस्या पूनम इंगवले या सांगोला पंचायत समितीच्या
भाजपच्या पहिल्या सभापती तर नाझरे पंचायत समिती गणातून विजयी झालेले शिवसेनेचे अजय सरगर हे उपसभापती होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.


0 Comments