google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

Breaking News

सांगोला तालुक्यात वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

सांगोला तालुक्यात वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या


सांगोला : अज्ञात कारणावरून ७५ वर्षीय वृद्धाने शेतातील आंब्याच्या झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली.

 ही घटना गुरुवार ५ मार्च रोजी दुपारी ३:४० च्या सुमारास गळवेवाडी 

(ता. सांगोला) येथे घडली. विष्णू मारुती टोणे (वय ७५, रा. गळवेवाडी, ता. सांगोला) असे मृताचे नाव आहे.

 याबाबत सांगोला ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांनी खबर दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

मृत विष्णू टोणे यांनी झाडाच्या फांदीला गळफास घेतल्याची माहिती मिळाली. 

नातेवाईक संजय टोणे यांनी त्यांना खाली उतरून तातडीने उपचाराकरिता सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments