प्रत्येक स्त्रीने आर्थिक संकटात सामोरे जाण्यासाठी आर्थिक सक्षम व्हावे
असे मानगंगा परिवार क्रेडिट सोसायटीच्या चेअरमन सौ अर्चनाताई नितीन इंगोले
कर्तुत्वान महिलांना प्रोत्साहन व प्रेरण देणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन मानगंगा परिवारातर्फे कर्तुत्वान महिलांचा मानगंगा नारी गौरव सोहळा संपन्न..
सांगोला प्रतिनिधी : जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील कर्तुत्वान महिलांचा गौरव करण्यासाठी मानगंगा परिवार व अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी
सांगोला तर्फे मानगंगा नारी गौरव सोहळ्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह सांगोला येथे भव्य आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी डॉक्टर सौ. सुपर्णा केळकर या होत्या.
महिला विविध क्षेत्रात स्वतःच्या बुद्धिमत्तेवर व कष्टाच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत व ही बाब कौतुकास्पद आहे
तेव्हा प्रत्येक क्षेत्रातील कर्तुत्वान महिलांना प्रोत्साहन व प्रेरण देणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन मानगंगा परिवारातर्फे कर्तुत्वान महिलांचा मानगंगा नारी गौरव सोहळा आयोजित करून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांचा सन्मान करण्यात आला,
व प्रत्येक स्त्रीने आर्थिक संकटात सामोरे जाण्यासाठी आर्थिक सक्षम व्हावे असे मानगंगा परिवार क्रेडिट सोसायटीच्या चेअरमन सौ अर्चनाताई नितीन इंगोले यांनी यावेळी सांगितले.
तसेच एडवोकेट राजेश्वरी केदार यांनी संस्थेचे महिला बाबत धोरण चांगले असल्याचे सत्कार प्रसंगी सांगितले, तर महिलांनी सक्षमीकरण व स्वावलंबी बनणे गरजेचे आहे व यासाठी आर्थिक सक्षम व्हावे असे कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ सौ सुपूर्णा केळकर यांनी सांगितले.
तसेच माजी नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनीही सर्व महिलांना यावेळी शुभेच्छा दिल्या. सदर प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या यामध्ये डॉ सौ. सुपूर्णा केळकर, सौ अश्विनी माने,
सौ ज्योती महांकाळ, सो मनीषा लिगाडे, एडवोकेट राजेश्वरी केदार, सौ शबनम शेख, सौ प्रीती खडतरे, सौ अनुपमा गुळमिरे, सौ . योजना मोहिते, सौ ललिता चौधरी, सौ नम्रता भोसले इत्यादी महिलांचा मानगंगा नारी गौरव सोहळा म्हणून सन्मान करण्यात आला.
यावेळी नगरसेविका सौ राणीताई माने, सौ वैशाली सावंत, सौ गोदाबाई बनसोडे, सो आशादेवी यावलकर, सौ छाया मेटकरी, सौ सीमा सरगर, सो शोभा फुले, सौ श्रद्धा साबळे, सौ दिव्यांनी दौंडे, सौ, वैशाली झपके,
सौ. सुजाता केदार, सौ अनिता केदार, सौ, तनुजा एरंडे, तर जि प सदस्यां शोभा खटकाळे इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. यावेळी सुप्रसिद्ध निवेदक भारत मुढे यांचा मनोरंजनात्मक खेळ व स्पर्धा या खेळामध्ये सौ योजना मोहिते,
सौ सुवर्णा तेली, सौ सविता लोखंडे, सौ सारिका लोखंडे, सौ सुनंदा घोंगडे, सौ कोमल चांडोले इत्यादी महिलांना विजेते म्हणून घोषित करण्यात येऊन बक्षीसे देण्यात आली. शेवटी माणगंगा परिवाराच्या वतीने सदस्या सौ. संजीवनी घाडगे यांनी आभार मानले.


0 Comments