google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक! पत्नी पोलीस दलात स्वत: एसआरपीएफ, जवानाने स्वत:लाच संपवलं, दोन चिमुकल्यांचा आधार हिरावला; सोलापूर जिल्हा हादरला

Breaking News

खळबळजनक! पत्नी पोलीस दलात स्वत: एसआरपीएफ, जवानाने स्वत:लाच संपवलं, दोन चिमुकल्यांचा आधार हिरावला; सोलापूर जिल्हा हादरला

खळबळजनक! पत्नी पोलीस दलात स्वत: एसआरपीएफ, जवानाने स्वत:लाच संपवलं, दोन चिमुकल्यांचा आधार हिरावला; सोलापूर जिल्हा हादरला


सोलापुर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत दौंड येथील एसआरपीएफमध्ये कार्यरत असलेल्या जवानाने सोलापुरातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली.

विलास सर्जेराव शिंदे असे मृत जवानाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुले आणि पत्नी आहेत.

दरम्यान विलास शिंदे यांनी आत्महत्या का केली? याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही आहे.या प्रकरणाचा पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.

विलास शिंदे हे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील आहेत मात्र मागील काही वर्षांपासून मुळेगाव येथे सासरच्या घरी पत्नी, मुलांसह राहत होते. ते दौंड येथील एसआरपीएफ बल गट क्रमांक 7 मध्ये कार्यरत होते.

काल अचानक त्यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना समोर आली होती. या घटनेची माहिती मिळताच त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.

दरम्यान मृत जवानाची पत्नी पूनम शाम काळे या सोलापूर शहर पोलीस मुख्यालयात पोलीस म्हणून कार्यरत आहेत. विलास शिंदे आणि पूनम काळे यांचा 2014 मध्ये प्रेमविवाह झाला होता.

दोघांचा संसार सुरळीत सुरू असताना अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.विलास शिंदे यांच्या पश्चात आई, पत्नी, पाच वर्षांची मुलगी

 आणि तीन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. या आत्महत्येच्या घटनेने दोन्ही मुलांच्या डोक्यावरील वडिलांच छत्र हरपलं आहे.

एसआरपीएफ जवान शिंदे यांनी आत्महत्या का केली कारण अद्यापही अस्पष्ट आहे. प्रकरणाचा पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments