सांगोल्यात मा. आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची तातडीची बैठक
सांगोला : सांगोला तालुका व शहरातील मा. आमदार दिपकआबा साळुंखे‑पाटील यांच्या गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत आगामी राजकीय घडामोडी, संघटनात्मक बांधणी तसेच विविध स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
या बैठकीस स्वतः मा. आमदार दिपकआबा साळुंखे‑पाटील उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून
तालुका व शहरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सदर बैठक रविवार दिनांक ८ मार्च २०२६ रोजी दुपारी ४ वाजता सांगोला येथील वाढेगाव रोडवरील श्री. तानाजीकाका पाटील यांच्या जुने निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस तालुका व शहरातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन
आयोजक मधुकर बनसोडे, सखुबाई वाघमारे आणि सुभाष उर्फ तानाजीकाका पाटील यांनी केले आहे.


0 Comments