लक्ष्मी दहिवडी ते वाढेगाव रस्ता लवकरच दुरूस्त करू - अतुल पवार लक्ष्मी दहिवडी मध्ये
नुतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा संपन्न
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
मंगळवेढा-गावाच्या व गटाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण सर्वस्व पणाला लावून विकास कामे केली. लोकांच्या अडी-अडचणी लक्षात
घेऊन त्या अडचणी जागेवर सोडविल्याने जवळा गटातुन मला मतदारांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. गटातील कामे करत
असताना विकासकामांवर विशेष लक्ष ठेवणार आहे. याशिवाय लक्ष्मी दहिवडीतील लोकांचे माझ्यावर विशेष प्रेम आहे.
माझ्या गावाच्या नजीक व दोन्ही तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या लक्ष्मी दहिवडीतील नागरीकांना
सांगोला ये-जा करण्यासाठी दळणवळणचा साधन म्हणून लक्ष्मी दहिवडी ते वाढेगाव हा रस्ता जिल्हा परिषदेचे पहिल्यांच मिटिंग
मध्ये मंजुरी करून घेऊन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही सत्कार समारंभ कार्यक्रम बोलताना अतुल पवार यांनी दिली.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार लक्ष्मी दहिवडीतील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
हा कार्यक्रम विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत साळे, नागेश गुरव, रामेश्वर जुंदळे, पप्पू स्वामी यांनी यशस्वीपणे पार पाडला.
या कार्यक्रमासाठी सत्कार मुर्ती जिल्हा परिषद जवळा गट अतुल पवार, महुद दादासाहेब लवटे, करगणी विनायक मासाळ,
कडलास शोभाताई खटकाळे, पंचायत समिती गणातुन लवंग ऋतुजा पराडे पाटील, दामाजी नगर जयश्री शिंदे, मरवडे मोहिनी पाटील आदींसह प्रमुख उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी क्राँग्रेस अजित पवार गट जिल्हा
कार्यकारी अध्यक्ष रामेश्वर मासाळ, सांगली जिल्हा युवक अध्यक्ष अनिल पाटील, युवा शिवसेना संपर्क प्रमुख सागर पाटील, अकलूज युवा नेते विक्रम पराडे पाटील, वासुद अकोला योगेश खटकाळे आदी नुतन जिल्हा परिषद व पंचायत समिती
सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व हार घालून सत्कार करण्यात आला.
लक्ष्मी दहिवडीत प्रथम सर्वपक्षीय नुतन सदस्यांचा सत्कार आयोजित केल्याने या सत्कार समारंभाची चर्चा सांगोला व मंगळवेढा तालुक्यात होत
असून नविन सदस्यांना सत्काराच्या माध्यमातून प्रोत्साहन भेटावे म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान अनेक नुतन सदस्यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमांसाठी पैलवान आबासाहेब वाघमारे-पाटिल, मोहन गंभीरे पाटील, ऍड. समाधान दिवसे, प्रविण नवले, गणपत बनसोडे सावकार, गंगाधर मसरे, महेश स्वामी,
प्रशांत पाटील, सिद्राम गुरव, सुनिता राजमाने, सोमनाथ व्होनमाने, राहूल मेटकरी, दादासाहेब शिंगाडे, मधुकर जुंदळे, दादासाहेब गायकवाड, विश्वनाथ वाघमारे,
अनिल आदलिंगे, एल डी जुंदळे, नवनाथ बनसोडे आदींसह गावातील अनेक आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामेश्वर जुंदळे यांनी केले तर सुञसंचलन व आभार प्रदर्शन भारत मुढे यांनी केले.




0 Comments