ऐकावं ते नवलाचं..! बायकोने दीड कोटींना नवरा विकला,
गर्लफ्रेंडने पैसे मोजताच दिला 'हँडओव्हर'; 'जुदाई'च्या रियल लाइफ स्टोरीची गावभर चर्चा
वास्तवातील घटनांवरून अनेक चित्रपट तयार झाले आहेत. मात्र चित्रपटातली घटना वास्तवात आल्याचं पहिल्यांदाच घडलंय. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या जुदाई चित्रपटाची रिअल स्टोरी भोपाळमध्ये घडली आहे.
1997 मध्ये रिलाज झालेला जुदाई चित्रपट प्रचंड गाजला होता. 'पती, पत्नी और वो' असं कथानक त्या चित्रपटात होतं. पैशाच्या हव्यासापोटी काजलची भूमिका करणारी
श्रीदेवी तिचा इंजिनिअर पती राज म्हणजेच अनिल कपूरची विक्री करते. जान्हवीची भूमिका करणारी उर्मिला मातोंडकर 2 कोटी रुपये श्रीदेवीला देते, अशीच स्टोरी भोपाळमध्ये झाली.
सरकारी अधिकाऱ्यावर प्रेम करणाऱ्या त्याच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यानं डुप्लेक्स घर आणि 27 लाख रुपये दिले. वरिष्ठ महिला अधिकाऱ्यानं अधिकाऱ्याच्या पत्नीला दीड कोटींची मालमत्ता देऊन घटस्फोटासाठी मदत केली.
नेमकं काय घडलं?
भोपाळमधील कौटुंबिक न्यायालयात एका 42 वर्षीय सरकारी अधिकाऱ्यानं त्याच्या 54 वर्षीय महिला वरिष्ठ अधिकाऱ्यासोबतचे संबंध मान्य करत
पत्नीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला . परिणामी वाद वाढल्यानंतर अधिकाऱ्याच्या मोठ्या मुलीने न्यायालयात तक्रार केल्यानंतर खटला सुरू झाला.
हिंदू विवाह कायद्यानुसार समेटाचे प्रयत्न झाले, मात्र संबंधातील दरी भरून निघाली नाही. अखेर परस्पर संमतीने घटस्फोटाचा मार्ग स्वीकारण्यात आला.
पत्नीला घर आणि 27 लाख रुपये अशी दीड कोटींची मालमत्ता देण्याचं मान्य करण्यात आलं. ही रक्कम दोन्ही मुलींच्या शिक्षण आणि भविष्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने देण्यात येणार आहे.
भोपाळमधील अनोखा घटस्फोट देशात चर्चेचा विषय
संबंधित अधिकारी आणि त्याची महिला वरिष्ठ अधिकारी एकाच विभागात कार्यरत होते. प्रोजेक्ट आणि बैठकीदरम्यान वाढलेल्या जवळीकीतून त्यांच्यात प्रेम निर्माण झालं, मात्र कुटुंब दुरावलं.
या प्रकरणात कधीही घडत नाही अशी घटना घडली. तिसऱ्या व्यक्तीनं आर्थिक जबाबदारी स्वीकारण्याचं दुर्मिळ उदाहरण इथं पाहायला मिळालं. एकंदरीतच
भोपाळमधील हा अनोखा घटस्फोट आणि समेटाचं प्रकरण देशात चर्चेचा विषय ठरलाय. आता त्यावर चित्रपट तयार होईल की नाही, हे सांगता येत नाही.


0 Comments