google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कडलास जिल्हा परिषद गटातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, स्वच्छता,प्राथमिक शिक्षण या मूलभूत प्रश्नाला देणार प्राधान्य: उमेदवार शोभाताई खटकाळे

Breaking News

कडलास जिल्हा परिषद गटातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, स्वच्छता,प्राथमिक शिक्षण या मूलभूत प्रश्नाला देणार प्राधान्य: उमेदवार शोभाताई खटकाळे


कडलास जिल्हा परिषद गटातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य,


स्वच्छता,प्राथमिक शिक्षण या मूलभूत प्रश्नाला देणार प्राधान्य: उमेदवार शोभाताई खटकाळे

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

कडलास जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार शोभाताई बाबासाहेब खटकाळे व कडलास गणाच्या उमेदवार राणीताई सुरज पाटील यांच्या प्रचारार्थ कडलास येथे मतदारांच्या गृहभेटीला उस्फूर्त प्रतिसाद 

सांगोला/ प्रतिनिधी: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कडलास जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थांचे मूलभूत प्रश्न रस्ते ,

पाणी, वीज, आरोग्य, स्वच्छता, प्राथमिक शिक्षण या प्रश्नाला सर्वाधिक प्राधान्य देऊ असा विश्वास कडलास जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार शोभाताई बाबासाहेब खटकाळे यांनी ग्रामस्थांना दिला आहे .

 निवडणुकीच्या दृष्टीने कडलास गटातील कडलास येथे प्रचार करीत असताना घरोघरी जाऊन या गावातील महिला व ग्रामस्थांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी आपण कटीबद्ध राहू 

असा ठाम विश्वास येथील मतदार जनतेला देण्यात आला.  कडलास गणाच्या शिवसेनेच्या उमेदवार राणीताई सुरज पाटील याही या प्रचारामध्ये सहभागी झाल्या होत्या. कडलास येथील लिगाडे गल्लीतून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमास व प्रचारास सुरुवात करण्यात आली. 

मा. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे दोन्ही उमेदवार प्रचारात आघाडीवर असून हे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील अशा प्रतिक्रिया जनसामान्यातून व्यक्त केल्या जात आहेत.

या प्रचारप्रसंगी अर्चना गायकवाड, अश्विनी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य मंगलताई लेंडवे, जयश्री पवार ,मालन गायकवाड, अर्चना गायकवाड, राजलक्ष्मी पाटील, प्रणाली शिंदे, सोनाली आसबे, वनिता केदार ,वर्षा पाटील, शोभा लिगाडे, सुमन जाधव या महिला भगिनींचा समावेश होता.

 तर मान्यवरामध्ये सुनीलनाना पवार, शहाजी चव्हाण, डॉ. विजय बाबर ,मुकुंद पाटील, नितीन गायकवाड, सयाजी गायकवाड, सुनील महांकाळ, सुशांत जाधव, सिद्धेश्वर ढेबे, वैभव लेंडवे, दत्ता गायकवाड, महेश गुरव हे सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments