google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लोक नेत्यांकडे धावत होते… आता नेता स्वतः लोकांकडे धावत आहे यांची कार्यपद्धती चर्चेतज जनता दारात… नेते गायब! आता मात्र अतुल (मालक) पवार लोकांच्या दारी — विरोधकांची झोप उडाली

Breaking News

लोक नेत्यांकडे धावत होते… आता नेता स्वतः लोकांकडे धावत आहे यांची कार्यपद्धती चर्चेतज जनता दारात… नेते गायब! आता मात्र अतुल (मालक) पवार लोकांच्या दारी — विरोधकांची झोप उडाली

लोक नेत्यांकडे धावत होते… आता नेता स्वतः लोकांकडे धावत आहे यांची कार्यपद्धती चर्चेतज


जनता दारात… नेते गायब! आता मात्र अतुल (मालक) पवार लोकांच्या दारी — विरोधकांची झोप उडाली

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला :आजपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना आपली कामे, अडचणी आणि प्रश्न घेऊन पुढाऱ्यांच्या दारात तासन्‌तास थांबावे लागत होते. “उद्या या, परवा या” म्हणत 

लोकांची फिरवाफिरवी करणारी राजकीय संस्कृती अनेक वर्षे चालू होती. मात्र अतुल (मालक) पवार यांनी ही जुनी पद्धत मोडीत काढत लोकांकडे थेट जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्याची नवी कार्यशैली सुरू केली आहे.

आजवरची राजकीय परंपरा काय होती? — जनतेने नेत्यांच्या दारात उभं राहायचं, विनवण्या करायच्या, आणि शेवटी “पाहू पुढे” असं उत्तर घेऊन परत जायचं.

पण आता चित्र उलटं झालंय. अतुल (मालक) पवार यांनी नेत्यांनाच लोकांच्या दारात जाऊन कामे व अडचणी विचारण्याची सवय लावली आहे.

गावागावात भेटी, प्रत्यक्ष संवाद आणि त्वरित निर्णय — या त्रिसूत्रीवर काम करत अतुल पवार यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरवले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दरम्यान, अनेक वर्षे सत्तेत राहूनही केवळ आश्वासनांची फुगे उडवणाऱ्या विरोधकांवर नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. 

निवडणुका आल्या कीच जनतेची आठवण काढणारे आणि उरलेल्या काळात गायब होणारे काही नेते आता अचानक सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र “काम केलेल्यालाच मान” अशी स्पष्ट भूमिका मतदार घेत असल्याचे दिसून येते.

लोकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी केवळ टीका आणि अडथळे निर्माण करणाऱ्या विरोधकांपेक्षा प्रत्यक्ष काम करणाऱ्या नेतृत्वाला लोक प्राधान्य देत आहेत.

 “कार्यालयात बसून राजकारण” करणाऱ्यांना आता “मैदानात उतरून काम” करणाऱ्यांनी चांगलाच धडा शिकवला आहे, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.

Post a Comment

0 Comments