google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 रेल्वे भुयारी मार्ग बंदमुळे शहरात उपायोजना करा ,दिशादर्शक फलक लावावेत :–अशोक कामटे संघटना

Breaking News

रेल्वे भुयारी मार्ग बंदमुळे शहरात उपायोजना करा ,दिशादर्शक फलक लावावेत :–अशोक कामटे संघटना

रेल्वे भुयारी मार्ग बंदमुळे शहरात उपायोजना करा ,दिशादर्शक फलक लावावेत :–अशोक कामटे संघटना  


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी): सांगोल्यातील मिरज रस्त्यावरील रेल्वे गेट क्रमांक 32 (आर यु बी) भुयारी मार्ग दहा जानेवारीपासून बंद राहणार 

असल्याची रेल्वे विभागाने कळविले आहे पण या मार्गावरून जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे

 त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते याकरिता आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात 

याकरिता रेल्वे विभाग व मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्याकडे निवेदनाद्वारे शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेने मागणी केली आहे.

सदरची रेल्वे भुयारी मार्ग दोन महिन्यांकरता दुरुस्तीकरिता बंद राहणार असल्याने शहरात

 वाहतूक कोंडी न होण्याकरता उपाययोजना कराव्यात अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने केली आहे.

याकरिता पंढरपूर रोड जवळील NH166 बायपास, वाढेगाव नाका, कडलास नाका , वासुद चौक या ठिकाणी पर्यायी मार्गाने जाण्याकरता ठिकठिकाणी दिशादर्शक मोठे बोर्ड लावावेत

 त्यामुळे मिरजकडे शहरातून जाणारी सर्व वाहने बाहेरील बायपासने इच्छित स्थळी पोहोचू शकतील तसेच या सर्व अडचणींची राज्य, जिल्हाबाहेरील वाहनांना कल्पना नसल्याने ते थेट

 सांगोला शहरातील भुयारी मार्ग जवळ येऊन महात्मा फुले चौक, स्टेशन रोड नगरपालिका व बायपास मार्गे जाऊ शकतात.

 त्या ठिकाणी प्रचंड कोंडी होऊ शकते, शहरात भुयारी गटारी कामासाठी रस्ते प्रचंड मोठ्या प्रमाणावर खोदलेले आहेत 

त्यामुळे शहरात धुळीचे प्रमाण वाढणार आहे शहरातील रस्ते ही अधिकाधिक वाहतुकीमुळे खचण्याची शक्यता आहे 

त्यामुळे शहरातील व्यापारी रहिवाशांना याचा त्रास होणार आहे याकरिता रेल्वे नगरपालिका, व पोलीस प्रशासनाने आवश्यक 

त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता वाहतूक नियंत्रण करणे गरजेचे आहे 

त्यामुळे वाहतुक विस्कळीतपणा येणार नाही याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी अशोक कामटे संघटनेने केली आहे.

शहीद अशोक कामटे संघटनेच्या निवेदनाप्रमाणे आम्ही शहरात वर्दळीच्या सर्वच ठिकाणी धुरळा उडू नये म्हणून टँकरद्वारे वारंवार पाणी मारण्याची दररोज व्यवस्था करणार आहे.

सांगोला शहरालालगत जो बायपास रस्ता जातो त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईटची सोय केली आहे, रस्त्यावरील अतिक्रमित झाडांचे फाटे तोडण्यात आले आहेत

 त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहतूक कोंडी होणार नाही, आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक ही लावण्यात येणार आहे. 

तसेच शहरातील वाहतूक नियंत्रित राहण्याकरता पोलीस स्टेशन वाहतूक शाखेशी पत्रकार करून पुढील कार्यवाही करणार आहोत.

 डॉ. सुधीर गवळी मुख्याधिकारी सांगोला ,नगरपरिषद

Post a Comment

0 Comments