google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला महाविद्यालया तर्फे शिवणे गावचे सरपंच मा.दादासाहेब घाडगे यांचा सन्मान

Breaking News

सांगोला महाविद्यालया तर्फे शिवणे गावचे सरपंच मा.दादासाहेब घाडगे यांचा सन्मान

सांगोला महाविद्यालया तर्फे शिवणे गावचे सरपंच मा.दादासाहेब घाडगे यांचा सन्मान


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला - महाविद्यालय आणि शिवणे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिरात शिवणे

 गावचे सरपंच दादासाहेब घाडगे यांनी दिलेल्या योगदानाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने 

त्यांचा सन्मान करण्यात आला.याप्रसंगी सहभाग नोंदविणाऱ्या शिबिरार्थी विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत शिवणे 

यांच्या मार्फत सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड होते. 

यावेळी संस्था उपाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सचिव ॲड.उदयबापू घोंगडे, सहसचिव साहेबराव ढेकळे,

 सदस्य विश्वनाथ चव्हाण, शामराव लांडगे, सु.ग.फुले, प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले उपस्थित होते.

यावेळी बाबुराव गायकवाड, दादासाहेब घाडगे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना

 कार्यक्रमाधिकारी डॉ.सदाशिव देवकर, सूत्रसंचालन डॉ.भाग्यश्री पाटील यांनी केले. आभार डॉ.रेणुकाचार्य खानापुरे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments