तुमच्यातील 'सेवारत्नाचा' होणार सन्मान! सांगोला नगरीत रंगणार भव्य दिव्य पुरस्कार सोहळा;
२५ जानेवारी पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन*
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
प्रत्येक माणूस आपलं नशीब घेऊन जन्माला येतो, पण समाजाचं नशीब बदलण्याची ताकद केवळ काही मोजक्याच 'वेड्या' आणि 'ध्येयवेड्या' माणसांमध्ये असते. चौकटीबाहेर जाऊन समाजासाठी झिजणाऱ्या
अशाच सेवाभावी वृत्तीचा गौरव करण्यासाठी 'सीबीएस न्यूज मराठी' डिजिटल नेटवर्क सज्ज झाले आहे. गेल्या सहा वर्षांची यशस्वी परंपरा कायम राखत, यावर्षी सातव्या वर्धापन दिनानिमित्त 'राज्यस्तरीय
आदर्श सेवा रत्न पुरस्कार २०२६' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राज्यातील विविध क्षेत्रांतील इच्छुकांना पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन सीबीएस न्यूज मराठी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
गेल्या सहा वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या या उपक्रमात यंदाही विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव महाराष्ट्रातील प्रतिष्ठित मान्यवर
व सिनेअभिनेते अभिनेत्री यांच्या हस्ते होणार आहे.विशेषतः या पुरस्कार वितरण सोहळ्यात सामाजिक राजकीय कार्यकर्ते नेते ,पत्रकार प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका,
अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस, डॉक्टर, नर्स, वकील,महावितरण कर्मचारी, महापालिका व जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोस्ट कर्मचारी यांसह सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा समावेश असेल.
सांगोला शहरात संपन्न होणाऱ्या या अविस्मरणीय सोहळ्याला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि चित्रपट क्षेत्रातील नामवंत सेलिब्रिटी, विचारवंत तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
निवड झालेल्या पुरस्कारार्थींना विशेष गौरव चिन्ह, सन्मानचिन्ह आणि मानाचा फेटा देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. एक अविस्मरणीय देखणा आणि दिमाखदार सोहळा असल्यामुळे काळजीपूर्वक प्रस्ताव पाठवावा.
प्रस्ताव कसा पाठवायचा? पुरस्कारासाठी इच्छुक उमेदवारांनी आपला सविस्तर प्रस्ताव २५ जानेवारी २०२६ पर्यंत खालील माहितीसह पाठवणे आवश्यक आहे:
माहितीमध्ये : संपूर्ण नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, शैक्षणिक पात्रता. कार्याचा तपशील: आपण कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे, त्याचा संक्षिप्त अहवाल व संबंधित कागदपत्रांच्या/प्रमाणपत्रांच्या
छायांकित प्रती. इतर: यापूर्वी मिळालेले पुरस्कार आणि व्यवसायाची माहिती सविस्तर पाठवणे आवश्यक आहे..विशेषतः प्रस्ताव विहित नमुन्यात ९९२२५७०८९६ या क्रमांकावर किंवा Chandshekh78656@gmail .Com या मेल वरती पाठवावे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ जानेवारी २०२६ असून, त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. निवड समितीचा निर्णय अंतिम राहील, असे सीबीएस न्यूज मराठी डिजिटल नेटवर्क महाराष्ट्र राज्याच्या वतीने कळविण्यात आले आहे.


0 Comments