वाकी – शिवणे गणातून सौ.धनश्री चव्हाण पंचायत समिती निवडणूक लढवणार..!
सांगोला प्रतिनिधी/
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला तालुक्यातील पंचायत समिती वाकी शिवणे गणातून धनश्री बबन चव्हाण रा.नवी लोटेवाडी यांनी अपक्ष म्हणून
निवडणूक लढवण्याची घोषणा करताच संपूर्ण सांगोला तालुक्यात राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.निर्भीड ,सामाजिक कार्यकर्ते,
अन्यायाविरोधात आपल्या प्रबळ लेखणीने सतत अन्याया विरोधात संघर्ष करणारे पत्रकार बबन किसन चव्हाण यांच्या सुविद्य
पत्नी असलेल्या धनश्री चव्हाण या आता थेट जनतेच्या न्याय हक्कांसाठी निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहे.
धनश्री चव्हाण या केवळ नावापुरत्या उमेदवार नसून, सामान्य जनतेच्या दुःखात सहभागी होणारे, विश्वास संपादन करणारे आणि संघर्षातून घडलेले नेतृत्व म्हणून ओळखल्या जात आहेत.
गेली वर्षानुवर्षे वाकी - शिवणे गणातील जनतेला फक्त आश्वासनांची बोळवण करण्यात आली
मात्र पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
याच अन्यायाविरोधात आता “ पैशांच्या ताकदीला नाही, जनतेच्या विश्वासाला मत ” हा नारा देत धनश्री चव्हाण यांनी अपक्ष म्हणून स्वाभिमानाची लढाई उभारली आहे.
ही माझी पंचायत समिती निवडणूक मी पैशाच्या जोरावर नाही, तर जनतेच्या विश्वासावर
आणि स्वाभिमानाच्या ताकदीवर जिंकणार असा ठाम विश्वास धनश्री ताई चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
आज त्यांच्या पाठीशी शेतकरी, कामगार, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उभे राहत आहेत.
त्यामुळे ही लढत केवळ उमेदवारांची नसून पैशांच्या राजकारणाविरोधातील आणि स्वाभिमानाच्या विजयासाठीची निर्णायक लढाई ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.


0 Comments