एखतपुर जिल्हा परिषदेसाठी सौ.सिंधुताई आलदर व वाकी पंचायत समिती गणासाठी सौ.स्मिता गोडसे यांच्या नावाची चर्चा जोरात
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा कधीही होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष इच्छुक उमेदवारांची चाचपणी करताना दिसत आहेत.
एखतपुर जिल्हा परिषद गट हा ओबीसी महिलेसाठी आरक्षीत झालेला असुन वाकी पंचायत समिती गण सुध्दा ओबीसी महिलेसाठी आरक्षीत झालेला आसल्याने या गटातुन जिल्हा परिषदेसाठी
आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांचे कट्टर समर्थक असलेले वाकी-नरळेवाडी येथील प्रगतिशील बागायतदार भाई मोहन विठ्ठल आलदर यांच्या सुविद्य पत्नी सौ.सिंधुताई मोहन आलदर या ईच्छुक आहेत.सिंधुताई आलदर यांचे इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण झालेले
असुन त्यांना प्रथमपासूनच सामाजीक कार्याची आवड आहे.सौ.सिधुताई आलदर यांनी यांनी अनेक महिलांना प्रापंचीक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत.त्यांचे पती भाई मोहन आलदर हे. शेतकरी कामगार पक्षाचे व
आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांचे कट्टर समर्थक आहेत.आलदर कुटु़ंब हे स्व.आबासाहेब यांच्या सोबत अनेक वर्ष होते व आज हे कुटुंब आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या सोबत काम करीत आहेत.
आलदर कुटुंबीयांचा शेती हा पारंपारीक व्यवसाय आसुन.ते डाळींब उत्पादनात नावलौकिक मिळवलेले कुटुंब आहे.भाई मोहन आलदर हे नरळेवाडी विकास सोसायटीचे बिनविरोध संचालक व पाच वर्ष चेअरमन म्हणून उत्कृष्ट काम पाहिले आहे.
मोहन आलदर यांनी वाकी-नरळेवाडी , शिवणे कोळा, जुनोनी या भागातील तरुणांना डाळींब व्यवसायाच्या माध्यमातून सहकार्य केले आसुन अनेक तरुणांना व्यावसायिक म्हणून पुढे आणन्यामध्ये आदलदर यांचे मोठे सहकार्य केले आहे.
अनेक तरुणांना व्यावसाय करण्यासाठी अर्थीक मदत उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.आलदर यांच्या सहकार्याने अनेक कुटुंबे उभी राहिली आहेत.गावातील गोरगरीब नागरीकांना दवाखान्यासारख्या ठिकाणी योग्य याला
वाकी - नरळेवाडी गावामध्ये अनेक सामाजीक उपक्रम राबवत असताना आलदर यांचा पुढाकार असतो.वाकी गावातील अंबाबाई मंदिर व महादेव मंदिराच्या बांधकामासाठी भरीव आर्थिक मदत केली आहे.
भाई मोहन आलदर व आलदर कुटुंबांने सतत सामाजीक कार्यात सहभाग घेतलेला आहे.स्व.आबासाहेबांचे वाढदिवस व आता होणारी जयंती तसेच आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांचा वाढदिवसा निमित्त
घेण्यात येणाऱ्या रक्तदान शिबीरे सर्वरोग निदान शिबारे,तसेच शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप व खाऊ वाटप करीत असताना मोहन आलदर यांचा विशेष सहभाग असतो.
आलदर कुटुंबांना आतापर्यंत पक्षाचे काम करीत असताना कुठल्याही पदाची अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेने काम केले आहे.एखतपुर गटातुन महिला आरक्षण पडले आसल्याने सौ.सिंधुताई मोहन आलदर यांनी शेतकरी कामगार पक्षाकडे रितसर मागणी केली आहे.
सद्या एखतपुर जिल्हा परिषद गटांमध्ये सौ.आलदर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
एखतपुर जिल्हा परिषद गटामधील वाकी पंचायत समिती गणांचा समाविष्ट असुन,वाकी पंचायत समिती गण हा सुध्दा ओ.बी.सी.महीलेसाठी राखीव झालेला असुन.या गणातुन गायगव्हाण गावच्या सौ.दिपक गोडसे या इच्छुक असुन..
सौ.स्मिता गोडसे या पुरोगामी युवक संघटनेचे तालुकाध्यक्ष भाई दिपक बाळासाहेब गोडसे यांच्या सुविद्य पत्नी असुन,सौ स्मिता गोडसे यांचे बारावी पर्यंत शिक्षण झालेले असुन त्या सुध्दा मा.दिपक गोडसे यांच्या बरोबरीने सामाजीक कार्यात सहभागी होत असतात.
भाई दिपक गोडसे यांनी स्व.आबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केले असुन सध्या गोडसे हे आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांचे विश्वासु सहकारी समजले जातात.गोडसे कुटुंब हे अनेक पिढ्यापासुन निष्ठेने शेतकरी कामगार पक्षाचे काम करीत आहेत.
मा.दिपक गोडसे हे सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असुन,त्यांनी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन म्हणून काम पाहिले आहे सध्या दिपक गोडसे विकास सेवा सोसायटीचे संचालक आहेत.
त्यांच्या सुविध्य पत्नी सौ स्मिता गोडसे या सुध्दा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालीका होत्या. सौ.स्मिता दिपक गोडसे यांनी गायगव्हाण गावचे सरपंच म्हणून अत्यंत चांगले काम केले आहे.
गायगव्हाण गावातील गरजुंना घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी स्मिता गोडसे यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत.
गावतील नवीन रस्ते व जुने रस्ते दुरुस्त केले आहेत.गावातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चांगल्या प्रकारची नवीन पाइप लाइन टाकून
पिण्याच्या पाण्याचा महत्वपूर्ण प्रश्न सोडवला आहे.पाणी फाऊंडेशन च्या माध्यमातून पाण्याच्या टंचाईवर मात केली आसुन एक सक्षम महिला सरपंच म्हणून सौ.स्मिता दिपक गोडसे यांच्या कामाचे कोतुक झाले आहे.
सौ.स्मिता गोडसे यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या निवडणूक प्रचारात डाॕ.सौ.निकीताताई बाबासाहेब देशमुख यांच्या बरोबरीने घर टु घर प्रचार केलेला असल्याने बहुतांश गावात सौ. स्मिता गोडसे यांचा जनसंपर्क आहे.
दिपक गोडसे व सौ.स्मिता गोडसे हे तरुण दांपत्य आसुन या दोघांनाही शेतकरी कामगार पक्षाच्या व पुरोगामी युवक संघटनेच्या माध्यमातून अनेक महत्वाच्या पदावरती करण्याची संधी मिळाली असुन त्या माध्यमातून हे दांपत्य सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील आसतात.
सौ.स्मिता दिपक गोडसे यांनी वाकी पंचायत समिती गणातुन शेतकरी कामगार पक्षाकडे रितसर उमेदवारीची मागणी केली आहे.सध्या एखतपुर जिल्हा परिषद गटातुन सौ.सिंधुताई आलदर व वाकी गणातुन सौ.स्मिता गोडसे यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे.


0 Comments