धक्कादायक! बापाने विहिरीत ढकलून जुळ्या मुलांचा घेतला जीव;
सोलापूर जिल्ह्यातील दुर्दैवी घटना; पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न
पोटच्या 6 वर्षांच्या जुळ्या लेकरांची हत्या; बापाचं कृत्य पाहून पोलीसही सुन्न; सोलापूर येथील घटना
बापाने पोटच्या सात वर्षाच्या जुळ्या चिमुकल्या मुलांना विहिरीत ढकलून देऊन दोघांचा जीव घेतल्याचा दुर्दैवी प्रकार शनिवारी सकाळी घडला.
या घटनेने केत्तूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.करमाळा तालुक्यातील केत्तूर येथील रहिवासी व वीज कंपनीत ऑपरेटर म्हणून कर्मचारी असलेले सुहास ज्ञानदेव जाधव
(वय ३२) याने घरात किरकोळ घडलेल्या घटनेतून रागाच्या भरात पोटच्या शिवांश व श्रेया या दोन चिमुकल्या मुलांना हिंगणी (ता. करमाळा) येथील शेतात नेले व तेथेच त्यांना विहिरीत ढकलून दिले.
त्यानंतर सुहास यांनीच काही वेळाने स्वतः घरी फोन करून हा प्रकार सांगितला. त्यानंतर घरातील सर्वजण विहिरीकडे धावत आले. मात्र, तोपर्यंत दोनही चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पाण्यात बुडून मृत्यू झालेली जुळी बहीण-भाऊ आहेत. या प्रकरणी करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
सुहासने आपल्या जुळ्या मुलांना कोणत्या कारणामुळे मारले याप्रकरणी पोलिस तपास करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी दिली.
..अन् त्याने विष घेतले
संशयित सुहास याने मुलांना विहीरीत ढकलून देत हत्या केल्यानंतर पश्चात्ताप झाल्याने विषारी औषध प्राशन केले.
पोलिसांनी त्याला ताब्यात 3 घेतल्यानंतर उपचारासाठी त्याला सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.


0 Comments