पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली अवैध वाळू उपशावर प्रहार सांगोला तालुक्यात
दोन ठिकाणी धडक कारवाई; टेम्पो व बैलगाड्या जप्त, तिघांविरुद्ध गुन्हे दाखल
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला :- सांगोला तालुक्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली
सांगोला पोलीस ठाण्याने करारी पावले उचलली असून, तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या धडक कारवाईत अवैध वाळू वाहतूक करणा-यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली आहे.
दि. १ जानेवारी २०२६ रोजी रात्री २२.३० वाजण्याच्या सुमारास मौजे गळवेवाडी (ता. सांगोला)
येथील स्मशानभूमीजवळ सुशांत भाऊसाहेब गळवे हा इसम टाटा कंपनीच्या ४०७ टेम्पो मधून कोणताही शासकीय पास, परवाना अथवा रॉयल्टी न भरता अंदाजे एक ब्रास वाळूची अवैध वाहतूक करताना आढळून आला.
या प्रकरणी पो.कॉ. रवींद्र साबळे यांनी फिर्याद दिली असून, आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) व पर्यावरण संरक्षण कायदा कलम ९ व १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच दिवशी सकाळी ०८.३०
वाजता मौजे सावे येथील माण नदीपात्रात बामणी ते सावे पुलाजवळ स्मशानभ मी परिसरात गणेश मच्छींद्र चव्हाण व आनंदा आण्णा लवटे हे दोघे बैलगाड्यांच्या सहाय्यान नदीपात्रातून अंदाजे एक ब्रास वाळूचा
अवैध उपसा करून वाहतूक करताना मिळून आले. पोलिसांनी दोन लाकडी बैलगाड्या, चाके व वाळू असा सुमारे ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या दोन्ही कारवायांमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली उडाली असून, पर्यावरणाचा न्हास करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिला आहे. सांगोला पोलीस ठाण्याच्या या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.


0 Comments