google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला नगरपरिषदेत शिवसेनेची एकहाती सत्ता; उपनगराध्यक्षपदी नितीन इंगोले, 13 जानेवारीला अधिकृत घोषणा

Breaking News

सांगोला नगरपरिषदेत शिवसेनेची एकहाती सत्ता; उपनगराध्यक्षपदी नितीन इंगोले, 13 जानेवारीला अधिकृत घोषणा

सांगोला नगरपरिषदेत शिवसेनेची एकहाती सत्ता; उपनगराध्यक्षपदी नितीन इंगोले, 13 जानेवारीला अधिकृत घोषणा


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला।प्रतिनीधी सांगोला नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष, गटनेते, उपगटनेते, प्रतोद व प्रवक्ते पदांच्या निवडीबाबतचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले 

असून, उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदाची अधिकृत घोषणा येत्या 13 जानेवारी रोजी केली जाणार आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ यांनी दिली.

सांगोला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नितीन इंगोले, गटनेतेपदी प्रशांत धनवजीर, उपगटनेतेपदी छायाताई मेटकरी, पक्ष प्रतोदपदी विवेक पाटील 

तर प्रवक्तेपदी अरुण पाटील यांच्या नावांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल करण्यात आले आहेत.

सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची एकहाती सत्ता स्थापन झाली असून, शिवसेनेचे आनंदभाऊ माने नगराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. 

एकूण 15 नगरसेवक शिवसेनेचे असल्याने शिवसेना आघाडी सांगोला या नावाने आघाडीचा प्रस्ताव सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला आहे.

या आघाडीच्या अध्यक्षपदी विवेक पाटील, उपाध्यक्षपदी सौ. राणीताई आनंदा माने, सचिवपदी सौ. आशादेवी सोमेश यावलकर, तर खजिनदारपदी चैतन्य राऊत यांची निवड करण्यात आली आहे.

 तसेच शिवसेना पक्षातर्फे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना पक्षादेश (व्हिप) बजावण्याचा अधिकार माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ यांना देण्यात आला आहे.

येत्या 13 जानेवारी रोजी सांगोला नगरपरिषदेची पहिली सर्वसाधारण बैठक पार पडणार असून, या बैठकीत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. 

त्यामुळे नगरपालिका निवडणुकीनंतर विविध पदांच्या निवडीसंदर्भातील प्रक्रिया पूर्णत्वास जात असून, आता केवळ अधिकृत घोषणांची औपचारिकता बाकी असल्याचे रफिकभाई नदाफ यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments