google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुजारवाडी येथे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंद भाऊ माने यांच्यासह नगरसेवकांचा सत्कार सोहळा संपन्न

Breaking News

पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुजारवाडी येथे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंद भाऊ माने यांच्यासह नगरसेवकांचा सत्कार सोहळा संपन्न

पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुजारवाडी येथे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंद भाऊ माने यांच्यासह नगरसेवकांचा सत्कार सोहळा संपन्न


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला  - एमश्री जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती पुजारवाडी यांच्यावतीने लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंद भाऊ माने तसेच

 नगरसेविका सौ.राणीताई माने ,सौ छायाताई मिटकरी,सौ. वैशाली सावंत व नगरसेवक . 

चैतन्य राऊत व काशिलिंग गावडे नगरसेवक रामभाऊ मदने यांचा सत्कार व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. 

 यावेळी लोक नियुक्त नगराध्यक्ष आनंद भाऊ माने यांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमर जाधव यांनी केला.

 यावेळी नगराध्यक्ष आनंद भाऊ माने यांनी शाळेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.

राणीताई माने यांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या कौसर मुलांनी यांनी केला.

 सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी राणीताई माने यांनी मुलांना स्वच्छतेचे,शिक्षणाचे महत्व सांगितले. 

सदरील शाळा नामांकित असून माझ्या परिसरातील आहे व शाळेच्या नावलौकिक वाढवण्यासाठी सर्व सहकार्य करण्याचे सांगितले. 

नगरसेविका सौ.छायाताई मेटकरी यांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ.आम्रपाली माने व 

सौ.काटे मॅडम यांनी केला. नगरसेविका सौ. वैशाली सावंत यांचा सत्कार शाळा समितीच्या सदस्या सौ. चंदनशिवे ताई यांनी केला. 

तर नगरसेवक काशिलिंग गावडे यांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य भोसले सर यांनी केला. नगरसेवक चैतन्य राऊत यांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष समाधान माने यांनी केला.

 सदर सत्कार सोहळ्यासाठी शाळा समितीचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पालक, 

शाळेची माजी मुख्याध्यापक लवटे सर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक कैलास होवाळ सर यांनी केले . 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षक संजय लवटे सर यांनी केले.

 सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजयमाला सावंत वर्षा देशपांडे नूतन डांगरे सुलभा भांबुरे जबीन मुलाणी जयश्री खांडेकर यासह सर्व शिक्षक शिक्षिका यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments