Breaking News

जनसामान्यांचे नेते अतुलमालक पवार , सर्वसामान्यांना कधीच विसरणार नाहीत जवळा जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार गटाचे उमेदवार अतुल पवार यांच्या गावभेट दौऱ्याला मोठा प्रतिसाद

जनसामान्यांचे नेते अतुलमालक पवार


, सर्वसामान्यांना कधीच विसरणार नाहीत


जवळा जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार गटाचे उमेदवार अतुल पवार यांच्या गावभेट दौऱ्याला  मोठा प्रतिसाद 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला /प्रतिनिधी:  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगोला तालुका अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य, जनसामान्यांचे नेते, युवा नेतृत्व अतुलमालक प्रभाकर पवार यांनी जवळा जिल्हा परिषद गटातून आपला निवडणूक अर्ज दाखल केला आहे. 

जवळा जिल्हा परिषद गटातून विविध गावात केलेल्या विकास कामामुळे व मोठ्या जनसंपर्कमुळे त्यांना या गटातून पदाधिकारी, कार्यकर्ते मतदार व युवावर्ग यांचा मोठा पाठिंबा असून विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. 

सन 2017 साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत एखतपूर जिल्हा परिषद गटात अतुलमालक पवार यांनी केलेल्या विकास कामामुळे व जनसंपर्कमुळे सुमारे सहा हजाराहून अधिक मताधिक्यांनी विजयी झाले होते. 

याचीच पुनरावृत्ती म्हणून जवळा जिल्ह्यात परिषद गटातून त्यांनी निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात विकास कामे केल्याने जनसामान्यांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली आहे.

 एक कामाचा व हक्काचा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. युवकांचे आशास्थान म्हणून अतुल मालक पवार यांची ख्याती आहे. जवळा जिल्हा परिषद गटात त्यांच्या उमेदवारीला मोठा पाठिंबा मिळत असून या निवडणुकीत 

यांचा विजय निश्चित मानला जात आहे. भविष्यातही या जवळा जिल्हा परिषद गटासाठी खूप मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी लावण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला जाईल असा ठाम विश्वास गावभेट दौऱ्या दरम्यान अतुल मालक पवार यांच्याकडून दिला जात आहे.

Post a Comment

0 Comments