google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 माजी आम. शहाजीबापू पाटील यांनी चिणके येथे कार्यकर्त्यांच्या अडी-अडचणी जाणून तात्काळ मार्गी लावण्याच्या केल्या सूचना

Breaking News

माजी आम. शहाजीबापू पाटील यांनी चिणके येथे कार्यकर्त्यांच्या अडी-अडचणी जाणून तात्काळ मार्गी लावण्याच्या केल्या सूचना

माजी आम. शहाजीबापू पाटील यांनी चिणके येथे कार्यकर्त्यांच्या अडी-अडचणी जाणून तात्काळ मार्गी लावण्याच्या केल्या सूचना 


कडलास जिल्हा परिषद गटाच्या शिवसेना- भाजप युतीच्या उमेदवार शोभाताई खटकाळे यांच्या प्रचारार्थ चिणके येथे गावभेट

सांगोला /प्रतिनिधी: कडलास जिल्हा परिषद गटाच्या  शिवसेना -भाजप युतीच्या शिवसेनेच्या उमेदवार शोभाताई खटकाळे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने चिणके येथे 

माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी गावभेट दिली. यावेळी कार्यकर्त्यांच्या विविध अडचणी जाणून घेण्यात आल्या. या अडचणी तात्काळ मार्गी लावण्याच्या संबंधितांना सूचना देण्यात आल्या.

 यावेळी शिवसेना–भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये चिणके गावातून  महायुतीच्या उमेदवार शोभाताई खटकाळे यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले.

 या आवाहनाला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. कोणत्याही परिस्थितीत उमेदवार शोभाताई खटकाळे यांना चिणके गावातून बहुमत देऊ असा विश्वास पदाधिकारी, कार्यकर्ते, युवावर्ग व मतदाराकडून व्यक्त करण्यात आला आहे

        यावेळी युवानेते योगेशदादा खटकाळे म्हणाले, चिणके गावातील व परिसरातील प्रश्न व विकास कामे निवडणुकीनंतर तात्काळ मार्गी लावू असे सांगत मातोश्री शोभाताई खटकाळे यांना चिणके गावातून बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले.

  या बैठकीसाठी माजी जि. प. सदस्य अशोकभाऊ शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले,माजी उपसरपंच मोहन मिसाळ, युवानेते योगेश दादा खटकाळे, युवासेना जिल्हा संपर्क प्रमुख सागरदादा पाटील, उद्योगपती बाळासाहेब आसबे, आगतराव मिसाळ ,

ग्रामपंचायत सदस्य भिमराव मिसाळ, अशोक शितोळे, तंटामुक्ती अध्यक्ष संजय मिसाळ , माजी ग्रामपंचायत सदस्य कृष्णदेव मिसाळ, माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजी कवठेकर,परमेश्वर गेजगे,लक्ष्मण येलपले, हणमंत येलपले, माजी ग्रामपंचायत सदस्य डॉ.बापू जाधव, 

माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब कवठेकर , समाधान चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते नारायण मिसाळ ,युवानेते साहेबराव मोहिते, माणिक मिसाळ, अंकुश मिसाळ, यांच्यासह शिवसेना-भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments