google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..सांगोला मिरज रोड वरील रेल्वे गेट क्र. ३२ दोन महिने बंद ठेवण्याबाबत.

Breaking News

मोठी बातमी..सांगोला मिरज रोड वरील रेल्वे गेट क्र. ३२ दोन महिने बंद ठेवण्याबाबत.

मोठी बातमी..सांगोला मिरज रोड वरील रेल्वे गेट क्र. ३२ दोन महिने बंद ठेवण्याबाबत.


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला मिरज रोडवरील बोगदा (गेट क्र.३२) हा १०/०१/२०२६, ते १०/०३/२०२६ या कालावधीसाठी रोड व भिंतीचे काम व वॉटर ट्रीटमेंट चे काम करणेकामी बंद करणेबाबतचे रेल्वे विभागाचे पत्र इकडील 

कार्यालयास प्राप्त झाले आहे. त्याअनुषंगाने सदरचा बोगदा (गेट क्र.३२) हा दिनांक १०/०१/२०२६ पासून पुढील दोन महिने बंद राहणार असून सांगोला हुन मिरज कडे जाणारी वाहतूक

 व्यवस्था ही पर्यायी मार्गावरून म्हणजेच वासूद चौक ते कडलास नाका ते वादेगाव नाका ते पंढरपूर रोड अंबिका मंदीर पासून ते महुद रोड या मार्गावरून करण्यात येणार आहे. मिरज हुन सांगोला कडे येणारी माहतूक व्यवस्था ही बायपास वरून वंदेमातरम चौकापासून करण्यात येत आहे, 

तसेच मिरज, पंढरपूर, जत, सोलापूर येथून ये-जा करणा-या जड वाहनांनी NH १६६ या नव्याने तयार झालेल्या महामार्गाचा अवलंब करणेबाबत शहरातील नागरिकांना आपल्या स्तरावरून व्यापक प्रसिध्दी देणेची कार्यवाही करावी,

Post a Comment

0 Comments