google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जवळा जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अतुल पवार यांनी सुरू केली विकासकामे

Breaking News

जवळा जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अतुल पवार यांनी सुरू केली विकासकामे

जवळा जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अतुल पवार यांनी सुरू केली स्वखर्चातून विकासकामे


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)





सांगोला - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगोला तालुका अध्यक्ष अतुल पवार यांनी जनतेच्या सुविधा लक्षात घेऊन स्वखर्चातून जवळा जिल्हा परिषद गटात विविध विकासकामांना प्रारंभ केला आहे. 

ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी घेतलेल्या या उपक्रमांचे उद्घाटन करण्यात येताच स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मांजरी येथे सचिन शिनगारे घर ते बिरुदेव माने घर रस्त्यांचे मुरुमीकरण, डॉ. अतुल जगताप घर ते जाधव वस्ती शाळा रस्त्यांचे मुरुमीकरण कामास सुरुवात करण्यात आली

 तर सावे येथे देवकते वस्ती ते खंडागळे वस्ती रस्त्याचे मुरुमीकरण, देवकते वस्ती रोड ते भीमराव वाघमोडे घर

रस्त्याचे मुरुमीकरण, दत्तात्रय वाघमोडे घर ते भास्कर वाघमोडे घर रस्त्याचे मुरुमीकरण, जुना दहिवडी रस्ता ते दुधाळ वस्ती रस्त्याचे मुरुमीकरण,

 लाला वलेकर घर ते लक्ष्मीदेवी मंदिर रोड रस्त्याचे मुरुमीकरण, जुना वाडेगाव रस्ता ते बाबासाहेब बंडगर घर रस्त्याचे मुरुमीकरण आदी कामे सुरु करण्यात आली आहेत.

जवळा जिल्हापरिषद गटात विविध गावांतर्गत रस्ते दुरुस्ती, वस्ती संपर्करस्ते तसेच वाहतूक सुलभतेसाठी आवश्यक असलेली पायाभूत कामे समाविष्ट आहेत. ग्रामस्थांची वर्षांनुवर्षे प्रलंबित मागणी लक्षात घेऊन ही कामे प्राधान्याने सुरू केल्याचे यावेळी सांगण्यात आले.

ग्रामीण विकासासाठी कोणत्याही निधीची प्रतीक्षा न करता स्वखर्चातून कामे सुरू करून जनतेच्या सेवेसाठी आपण कटिबद्ध आहोत, 

असे तालुका अध्यक्ष अतुल पवार यांनी यावेळी सांगितले. ग्रामीण भागातील रस्ते, सार्वजनिक सुविधांच्या उभारणीसाठी पुढील काळातही कामे सुरूच राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments