google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दुष्काळी सांगोला तालुका सुजलाम सुफलाम करणारच: माजी आमदार शहाजीबापू पाटील

Breaking News

दुष्काळी सांगोला तालुका सुजलाम सुफलाम करणारच: माजी आमदार शहाजीबापू पाटील

दुष्काळी सांगोला तालुका सुजलाम सुफलाम करणारच: माजी आमदार शहाजीबापू पाटील 




(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

*माजी आम. शहाजीबापू पाटील व सांगोला नगरपालिका निवडणुकीतील नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांचा मानेगाव येथे भव्य नागरिक सत्कार संपन्न 

* मानेगाव येथे युवानेते तानाजी ( बंडू) माणिक बाबर व उत्तम महादेव बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त शहाजीबापू पाटील यांच्याहस्ते सत्कार संपन्न

सांगोला/ प्रतिनिधी: सांगोला तालुक्यातील मानेगाव मानबिंदू व प्रेरणा देणारे गाव असून याविषयी आपणास आदर आहे. राजकीय जीवनात यश अपयश अनुभवले पण डगमगलो नाही. पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागलो. तालुक्यातील जनता सदैव माझ्या पाठीशी आहे. 

1995 साली मी आमदार झालो . त्यावेळी राज्यात शिवसेना भाजपची सत्ता होती. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथजी मुंडे यांनी दुष्काळी सांगोला तालुक्यातील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून टेंभू योजना मंजूर केली. 

सध्या विविध योजनेतून सांगोला तालुक्याच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागत आहे. सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी भरभरून निधी देऊन 

तालुक्याच्या विकासाला गती दिली.  सांगोला तालुक्याला लागलेला दुष्काळाचा कलंक पुसून सांगोला तालुका सुजलाम सुपलाम करणारच असे विचार सांगोला तालुक्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मानेगाव येथे व्यक्त केले. 

सांगोला नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे विजयी झालेले नगराध्यक्ष आनंदभाऊ माने व नगरसेवक- नगरसेविका यांचा नागरी सत्कार मानेगाव येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमप्रसंगी माजी आमदार शहाजीबापू पाटील हे बोलत होते.

                पुढे बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, लवकरच तालुक्यातील संपूर्ण भागाचा पाण्याचा प्रश्न पूर्ण होत आहे. मानेगावातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सदैव प्रेरणा देत आहे. शिवरायांचा इतिहास जगामध्ये श्रेष्ठ आहे.

 तीन वर्षांपूर्वी राज्यात राजकीय बंड करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिवसेना सरकार स्थापन केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तालुक्याच्या विकासासाठी सुमारे साडेपाच हजार कोटी रुपये निधी देऊन

 तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी गती दिली. मानेगावात विकास कामांचा डोंगर उभा केला तो केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शक्य झाले. येत्या तीन-चार वर्षात सांगोला तालुका सर्वाधिक पाणी असलेला 

तालुका म्हणून गणला जाईल. सरकारने निधी दिल्याने तालुक्याच्या विकासाला एक दिशा मिळाली. नुकत्याच पार पडलेल्या सांगोला नगरपालिका निवडणुकीत शिवसेना स्वतंत्रपणे लढली. या निवडणुकीत नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने यांच्यासह 15 नगरसेवक -

 नगरसेविका या निवडणुकीत विजयी झाले. हे मोठे ऐतिहासिक यश सर्वांच्या सहकार्याने मिळाले आहे. जनतेनेच निवडणूक हातात घेऊन शिवसेनेच्या हाती सत्ता दिली. त्याबद्दल शहाजीबापू पाटील यांनी जनतेचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. 

            यावेळी चोपडी जिल्हा परिषद गटाचे ज्येष्ठ नेते विजयदादा शिंदे म्हणाले, शहाजीबापूंच्या माध्यमातून सांगोला तालुक्याचा विकास झाला आहे. 

भविष्यातही शहाजीबापू सारख्या कणखर नेतृत्वाची तालुक्याला मोठी गरज आहे. तालुक्यातील जनतेने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत बापूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांचे हात बळकट केले पाहिजेत. 

विधानसभा निवडणुकीत  शहाजीबापू पाटील यांचा पराभव झाला नसता तर शहाजीबापू पाटील हे मंत्रिमंडळात मंत्री झाले असते. परंतु तालुक्यातील राजकारणामुळे बापूंचा पराभव झाला. 

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत बापूंनी खूप मोठे यश संपादन केले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीतही बापूंना भरीव यश देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे साथ देण्याची गरज आहे. 

       यावेळी मानेगाव ग्रामस्थांच्या वतीने माजी आमदार शहाजीबापू पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने, नगरसेवका राणीताई माने, छायाताई मेटकरी, 

आशादेवी यावलकर, गोदाबाई बनसोडे, नगरसेवक प्रशांत धनवजीर, काशिलिंग गावडे, ज्ञानेश्वर तेली, विवेक पाटील, अरुण पाटील, तसेच पोपट केदार विजयदादा शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. 

यावेळी सरपंच ताई माणिक बाबर व उपसरपंच तुकाराम नारायण बाबर व आदींच्या हस्ते मान्यवरांचे सत्कार संपन्न झाले .यावेळी माणिक जगन्नाथ बाबर, तानाजी मच्छिंद्र बाबर, बाळासाहेब भानुदास बाबर,

 बाबासो शंकर बाबर, आप्पासो माणिक बाबर, माजी सरपंच विश्वनाथ मच्छिंद्र पाटील, चेअरमन धनाजी महादेव बाबर यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उत्तम महादेव बाबर व तानाजी (बंडू) माणिक बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार शहाजीबापू पाटील व नूतन नगराध्यक्ष आनंदभाऊ माने यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवसानिमित विशेष सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या.

या सत्कार सोहळ्याचे  निवेदक म्हणून चोपडी गावचे सुपुत्र राहुल बजरंग बाबर यांनी उत्कृष्टपणे धुरा सांभाळली.

चौकट:१) माजी आम. शहाजीबापू पाटील यांनी सांगोला शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला व विकास कामे मार्गी लावली. भविष्यात नगरपालिकेच्या माध्यमातून सांगोला शहराचा

 परिपूर्ण विकास करण्यासाठी बापू भरीव निधी खेचून आणतील. सांगोला शहरवासीयांचे विकासाचे स्वप्न लवकरच पूर्णत्वास येणार आहे. नगरपालिका निवडणुकीत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना सर्वांनी पाठबळ दिले.आगामी जिल्हा 

परिषद पंचायत समिती निवडणुकीतही सर्वांनी बापूंना खंबीरपणे साथ देऊन विजय संपादन करूया. मानेगाव गावातील नागरी सत्कार मला विशेष प्रेरणा देणारा ठरत आहे. माने नावावरून मानेगाव तयार झाले याचा आनंद आहे. 

: लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने

चौकट: २) मानेगावच्या सरपंचपदी ताई माणिक बाबर यांची नियुक्ती झाल्यानंतर मानेगावमध्ये माजी आम. शहाजीबापू पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली कोट्यावधी रुपयांची विकास कामे मार्गी लागली आहेत. पेविंग ब्लॉक, रस्ते, रस्त्यांचे खडीकरण,

 डांबरीकरण, पाण्याची टाकी, बंदिस्त गटार, दलित वस्ती येथे गटार बांधणे, ग्रामसचिवालय या कामासाठी लाखो रुपयांचा निधी बापूंनी दिला आहे. यल्लमादेवी तलावाचे साठवण तलावात रूपांतर करणे यासाठी ६ कोटी, जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 

पिण्याच्या पाण्यासाठी १ कोटी रुपये निधी मिळाला आहे. एसबीआय बँकेने मानेगाव गाव दत्तक घेऊन गावामध्ये विकास कामे  सुरू केली आहेत. ठिबक सिंचन संच, बायोगॅस ,गांडूळ खत प्रकल्प, गरजू महिला शेतकऱ्यांसाठी भाजीपाला मंडप, 

सौरदिवे, पाणीपुरवठा विहिरीवर सौर प्रकल्प बसवून मानेगाव साठी दिवसा पाणीपुरवठा सोय केली . लवकरच कोल्ड स्टोरेज, शेतीमाल उत्पादनासाठी शेतकरी कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. आदी विविध प्रकारची विकास कामे मार्गी लागली. 

मानेगावासाठी टेंभू योजनेचे चालू असलेले काम जलद गतीने पूर्ण व्हावे. तलाव क्रमांक दोनचे साठवण तलावात रूपांतर करावे. मानेगावमध्ये व्यापार संकुल उभारण्यात यावे अशा प्रकारच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments