google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यातील राष्ट्रवादीत प्रमुख कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश - नूतन पदाधिकाऱ्यांच्या होणार निवडी : तालुकाध्यक्ष मा.अतुल पवार

Breaking News

सांगोल्यातील राष्ट्रवादीत प्रमुख कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश - नूतन पदाधिकाऱ्यांच्या होणार निवडी : तालुकाध्यक्ष मा.अतुल पवार

सांगोल्यातील राष्ट्रवादीत प्रमुख कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश -


नूतन पदाधिकाऱ्यांच्या होणार निवडी : तालुकाध्यक्ष मा.अतुल पवार 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला प्रतिनिधी : सांगोल्याच्या राजकारणातील वेगळी ओळख ओळख असलेले 

अतुल (मालक) पवार यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे. 

या निवडीनंतर प्रथमच त्यांनी तालुक्यातील नूतन पदाधिकारी निवडी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या जाहीर पक्षप्रवेशासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

     हा कार्यक्रम गुरुवार, दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता, वासूद रोड, कर्मवीर नगर, रोड क्र. ७, सांगोला येथे संपन्न होणार आहे. 

या कार्यक्रमात विविध पक्षांतील प्रमुख कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करणार असून तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या जाणार आहेत.

   यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष अतुल पवार म्हणाले, “सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी संघटनात्मक बांधणीवर भर दिला जाणार आहे.

 सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देत पक्षाचा नेता तालुक्यातून घडवण्यासाठी मी यापुढे नेटाने प्रयत्न करणार आहे.”

  अतुल पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादीची ताकद वाढताना दिसेल, 

अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या कार्यक्रमाकडे सांगोला तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments