google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 माजी आम. ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगोला नगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या नूतन नगराध्यक्ष- नगरसेवकांच्या भव्य नागरी सत्काराचे चोपडी येथे शुक्रवारी आयोजन

Breaking News

माजी आम. ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगोला नगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या नूतन नगराध्यक्ष- नगरसेवकांच्या भव्य नागरी सत्काराचे चोपडी येथे शुक्रवारी आयोजन

माजी आम. ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगोला नगरपालिका निवडणुकीत विजयी


झालेल्या नूतन नगराध्यक्ष- नगरसेवकांच्या भव्य नागरी सत्काराचे चोपडी येथे शुक्रवारी आयोजन 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला/ प्रतिनिधी:(दशरथ बाबर) नुकत्याच पार पडलेल्या सांगोला नगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे नेते, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व सांगोला तालुक्याचे लोकप्रिय माजी आम. ॲड. शहाजीबापू पाटील 

यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ऐतिहासिक विजय संपादन केला . या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने व 15 नगरसेवक- नगरसेविका यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला.  

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगोला नगरपालिका निवडणुकीतील यशामुळे नगरपालिकेत शिवसेनेची एक हाती सत्ता स्थापन होत आहे. शिवसेनेने मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाचे किंगमेकर माजी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील, 

माजी नगराध्यक्ष रफिकभाईं नदाफ, विजयाचे  मानकरी ठरलेले नगराध्यक्ष व नगरसेवक- नगरसेविका यांचा चोपडी ग्रामस्थांच्यावतीने भव्य नागरी सत्कार सोहळा शुक्रवार दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता चोपडी येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित केला आहे. 

तरी या सत्कार सोहळ्यासाठी सांगोला तालुक्यातील व चोपडी जिल्हा परिषद गटातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, युवावर्ग, शेतकरी बंधु भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन आयोजक व चोपडी ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments