google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मंगळवेढा - गणेशवाडी परिसरात फिरणारा तो बिबटया नसून तरस प्राणी असल्याची वनविभागाची माहिती

Breaking News

मंगळवेढा - गणेशवाडी परिसरात फिरणारा तो बिबटया नसून तरस प्राणी असल्याची वनविभागाची माहिती

मंगळवेढा - गणेशवाडी परिसरात फिरणारा तो बिबटया नसून तरस प्राणी असल्याची वनविभागाची माहिती


मंगळवेढा - गणेशवाडी व लेंडवे चिंचाळे परिसरात बिबटया फिरत असल्याचा 

एक व्हिडीओ प्रसार माध्यमांवर प्रसारित झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले 

असून सदर ठिकाणी वन विभागाच्या पथकाने भेट देवून वस्तूनिष्ठ माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता

 ते ठसे बिबटयाचे नसून तरस प्राण्याचे असावेत असा अंदाज वन विभागाने व्यक्त करून नागरिकांनी दक्षता घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

दि.23 डिसेंबर रोजी गणेशवाडी व लेंडवे चिंचाळे परिसरात एक बिबटया फिरत 

असल्याचा व्हिडीओ सर्व प्रसार माध्यमावर व्हायरल झाला होता.याबाबत तेथील 

पोलिस पाटील संजय मेटकरी यांनी वन विभागाच्या अधिकार्‍यांना कॉल करून बिबटया फिरत असल्याची माहिती

 दिल्यानंतर पंढरपूर विभागाच्या वन परिक्षक अधिकारी शितल चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल संतोष मुंडे,वनसेवक भागवत मासाळ

 आदींनी सदर ठिकाणी भेट देवून त्या ठशाची सुक्ष्म पाहणी केली असता ते ठसे तरस प्राण्याचे असावेत असा त्यांनी अंदाज व्यक्त केला.

तरस हा प्राणी माणसावर हल्ला करत नसून तो मृत जनावरांचे मांस भक्षण करतो.

असे सांगण्यात आले.पशूपालकांनी आपली जनावरे गोठयात सुरक्षीत ठिकाणी

 बांधून त्यांची दक्षता घ्यावी तसेच पालकांनी लहान मुलांची काळजी घ्यावी असे आवाहन वन विभाग प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान मंगळवारी सायंकाळी 7.30 वा. त्या प्राण्याने एका गणेशवाडीकडे जाणार्‍या 

तुकाराम कोळेकर या शिक्षकाच्या चार चाकी गाडीवर झडप मारली असून तो गोशाळेच्या पाठीमागच्या तळयाच्या दिशेने गेलेला

 असल्याबाबत मेसेज सोशल मिडीयावर सर्वत्र फिरत असून ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ओळी - गोणेवाडी,लेंडवे चिंचाळे परिसरात बिबटयाचा ठश्याव्दारे मागोवा घेताना वन विभागाचे पथक छायाचित्रात दिसत आहे.(छाया-प्रथमेशराजे

Post a Comment

0 Comments