सांगोला-मिरज रोडवर मोबाईल दुकानात चोरीची घटना सांगोल्यात मोबाईल शॉपीवर मोठी चोरी; ३.८८ लाखांचा मुद्देमाल गायब
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : अज्ञात चोरट्यांने मोबाईल शॉपी दुकानचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश करून
दुकानातील ३ लाख ८८ हजार रुपये किंमतीचे मोबाईल संच चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी सांगोला शहरात उघडकीस आली.
सत्यवान वसंत इंगवले (रा. मेडशिंगी)यांचे सांगोला-मिरज रोडवर मोबाईल दुकान आहे.
रविवारी रात्री ९ वा. च्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते. सोमवारी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानावरील पत्रा उचकटलेले दिसून आले.
दुकानाचे निरीक्षण केले असता दुकानातील विविध कंपन्यांचे ३ लाख ८८ हजाराचे मोबाईल चोरून नेल्याबाबत गुन्हा नोंद केला आहे.


0 Comments