google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील सर्व शेकाप कार्यकर्त्यांनी मीमांसा आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी विचारमंथन करण्यासाठी उपस्थित रहावेः डॉ अनिकेत देशमुख

Breaking News

सांगोला तालुक्यातील सर्व शेकाप कार्यकर्त्यांनी मीमांसा आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी विचारमंथन करण्यासाठी उपस्थित रहावेः डॉ अनिकेत देशमुख

सांगोला तालुक्यातील सर्व शेकाप कार्यकर्त्यांनी मीमांसा आणि येणाऱ्या


स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी विचारमंथन करण्यासाठी उपस्थित रहावेः डॉ अनिकेत देशमुख

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष ९५०३४८७८१२)

सांगोला नगरपालिकेत झालेल्या पराभवाची कारण मीमांसा आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी विचारमंथन करण्यासाठी शेकाप कार्यकर्त्यांची विचार मंथन बैठक स्वर्गीय डॉक्टर गणपतरावजी देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणी सांगोला आयोजित करण्यात आली आहे.

 सदर विचार मंथन बैठकीत सांगोला शहर आणि तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शेकाप नेते डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी केले आहे. 

सदर विचारमंथन बैठक आज गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २.०० वाजता पार पडणार असून, पक्षाच्या संघटनात्म क आणि राजकीय घडाम ोडींना अनुसरून ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. त्याम ळे सर्वांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सदर बैठकीचे अजेंडा विषय पुढीलप्रमाणेः

सार्वत्रिक स्थानिक निवडणुका २०२५-२६ संदर्भात सविस्तर चर्चा करणे, आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद

आबासाहेब यांच्या विचारांचा स्वाभिमानी शेतकरी कामगार पक्ष

निवडणुकांचा आढावा घेणे, परिस्थितीचे परीक्षण याबाबत तालुक्यातील राजकीय चर्चा करणे, मतदारसंघनिहाय पक्षबांधणी व संघटन मजबूत करण्याची दिशा ठरविणे,

पक्षाच्या हिताचे दीर्घकालीन नियोजन व रणनीती ठरविणे, स्थानिक नेतृत्व घडविण्यासाठी पुढील कार्ययोजना, मागील नगरपरिषद निवडणुकीचे आत्मपरीक्षण करणे,

कार्यकर्त्यांनी कोणत्याही भुलथापांना बळी न पडता आज आयोजित केलेल्या या बैठकीस ठीक दोन वाजता उपस्थित राहावे. कारण विद्यमान आमदार तसेच या तालुक्याचे लोकप्रतिनिधी बाबासाहेब देशमुख यांना

 स्वतः मी दोन ते तीन वेळा फोन केला असून त्यांच्या पीए मार्फत ही त्यांना निरोप मी दिला आहे, परंतु त्यांनी फोनही उचलला नाही. 

आणि तसा कोणताही निरोप मला आला नाही. सूतगिरणीचे चेअरमन यांना फोन करून या बैठकी संदर्भात सांगितले असता अशी कोणतीही बैठक सूतगिरणी वरती आयोजित करता येणार नाही असा निरोप दिला. 

परंतु पक्षाचा कार्यक्रम असल्याकारणाने कोणीही सदर बैठकीसाठी आडपाया न घालता विचारमंथन बैठकीसाठी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments