एपस्टिन फाईल होणार उघड; ६८ नवीन फोटो समोर, जगभरातील अनेक नेत्यांची उडाली झोप
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 19 डिसेंबरला मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे म्हणत थेट भारताचे पंतप्रधान बदलणार
असल्याचे सांगितल्याने एकच खळबळ उडाली. त्यानुसार आज जगप्रसिद्ध जेफ्री एपस्टीन सेक्स स्कँडल प्रकरणातील सर्व गोपनीय माहिती सार्वजनिक करण्यात येणार आहे.
19 नोव्हेंबर 2025 रोजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याविषयीच्या विधेयकावर स्वाक्षरी केली होती.
त्यानुसार, 30 दिवसांत ही गोपनीय माहिती सार्वजनिक करण्याचे निश्चित झाले होते.
अशातच आता अमेरिकन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमधील डेमोक्रॅट्सनी दोषी
लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनच्या इस्टेटमधून 68 नवीन फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
ज्यामध्ये अब्जाधीश उद्योगपती बिल गेटस् यांचे काही मुलींसोबतचे फोटो समोर आले आहेत.
बिल गेट्स यांच्यासह गुगलचे सर्गेई ब्रिन, नोम चॉम्स्की आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन यांचेही फोटो समोर आले आहेत.
हे फोटो प्रसिद्ध करण्याचा उद्देश एपस्टीनचे प्रभावशाली व्यक्तींशी असलेले संबंध उघड करण्याचा आहे.
तर लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनच्या मृत्यूपूर्वी हाऊस ओव्हरसाईट कमिटीने जप्त केलेल्या तब्बल 95,000 फोटोंपैकी हे 68 फोटो आहेत.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये अनेक देशांचे पासपोर्ट आणि ओळखपत्रांचा समावेश आहे,
ज्यामध्ये वैयक्तिक माहिती लपवण्यात आली आहे.
पासपोर्ट, व्हिसा आणि ओळखपत्रे आढळली
युक्रेन आणि रशियासारख्या देशांच्या पासपोर्टसह अनेक कागदपत्रांवर महिला असे चिन्हांकित केलेले आहे,
आणि ओळख लपवण्यासाठी फोटोंमधील अनेक चेहरे ब्लर करण्यात आले आहेत.
एपस्टीनजवळ सापडलेल्या साहित्यात रशिया, युक्रेन, दक्षिण आफ्रिका, लिथुआनियासारख्या देशांचे पासपोर्ट, व्हिसा आणि ओळखपत्रे आढळली आहेत.
सोबत एका अज्ञात व्यक्तीसोबत टेक्स्ट मेसेजचा स्क्रिनशॉट्सही जारी करण्यात आला आहे.
या मेसेजमध्ये मुली पाठवणे आणि १ हजार डॉलर प्रति मुलगी अशी किंमत असल्याचं म्हटले आहे.
ज्यात रशियातील एक १८ वर्षीय मुलीची ओळख सांगण्यात आली आहे. Epstein Files |
अनेक छायाचित्रांमध्ये व्लादिमीर नाबोकोव्ह यांच्या ‘लोलिता’ या कादंबरीतील काही वाक्ये एका महिलेच्या शरीराच्या विविध भागांवर लिहिलेले दिसतात.
एका अस्पष्ट फोटोत नोबेल पुरस्काराच्या सुरुवातीच्या ओळी महिलेच्या छातीवर लिहिलेल्या आहेत
हे फोटो राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्याय विभागाला शुक्रवारपर्यंत एपस्टीन आणि घिसलेन
मॅक्सवेलशी संबंधित फाइल उघड करण्याचे निर्देश देणाऱ्या कायद्यावर स्वाक्षरी केल्यानंतर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
याआधी प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये डोनाल्ड ट्रम्प, बिल क्लिंटन आणि ब्रिटनचे प्रिन्स अँड्रयू यांचा समावेश आहे.
जेफ्री एपस्टीन कोण होता?
जेफ्री एपस्टीन न्यू यॉर्कमधील उद्योजक होता.
त्याचे प्रमुख राजकारणी आणि सेलिब्रिटींशी मैत्री होती. 2005 मध्ये त्याच्यावर एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता.
2008 मध्ये त्याला एका अल्पवयीन मुलीकडून लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आणि
त्याने 13 महिने तुरुंगवास भोगला. त्याची जोडीदार, घिसलेन मॅक्सवेल हिला 2021 मध्ये त्याला मदत केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले.
ती 20 वर्षांची शिक्षा भोगत आहे. 2019 मध्ये, जेफ्रीला लैंगिक तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. खटल्यापूर्वी त्याने तुरुंगात आत्महत्या केली.
भारतावरही होणार परिणाम?
अमेरिकेच्या संसदेत खुल्या होणाऱ्या या फाईल्समधून जगाला हादरवणारी माहिती समोर येईल आणि याचा थेट परिणाम भारताच्या पंतप्रधानपदावर होईल,
असंही चव्हाण यांनी म्हटलं होतं. देशाचा पंतप्रधान बदलणार असल्याचा दावा त्यांनी केला.
तर मराठी माणूस देशाच्या पंतप्रधान पदी बसू शकतो असे मोठे वक्तव्य त्यांनी केले.
त्यांच्या मते या एपस्टीन फाईल्स प्रकरणात भारतातील दोन विद्यमान आणि एका माजी खासदाराचा समावेश आहे.
त्यामुळे सध्याचे सरकार अडचणीत येऊ शकते, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
दरम्यान, अमेरिकन हाऊस ओव्हरसाईट समिती एपस्टीनशी संबंधित 23 हजार पानांचा अहवाल आणि फोटो सार्वजनिक करणार आहेत.
त्यामुळेच अनेक देशात खळबळ उडाली आहे. याबाबत आणखी कोणती माहिती समोर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




0 Comments